Rohit Sharma Scold Younger Brother Viral Video: मुंबईचा राजा रोहित शर्माच्या नावाचं आयकॉनिक वानखेडे स्टेडियमवर स्टँड तयार करण्यात आलं आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दिमाखदार सोहळ्यात १६ मे रोजी रोहित शर्मा स्टँडचं अनावरण करण्यात आलं. रोहित शर्माचे आई-वडिल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रोहितच्या नावाच्या स्टँडचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमानंतरचा रोहित आणि त्याच्या भावाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

वानखेडे स्टेडियमवरील स्टँडच्या उद्घाटन सोहळ्याकरता रोहित शर्माचे आई, वडिल, त्याची पत्नी रितिका सजदेह, त्याचा भाऊ आणि त्याची पत्नी असं सारं कुटुंब उपस्थित होतं. रोहित शर्माने त्याच्या स्टँडच्या उद्घाटनासाठी स्टेजवरून खाली उतरून त्याचे आई-वडिल आणि पत्नीला स्टेजवर नेलं. यादरम्यान रोहितचे कुटुंबीय भावुक झालेलं पाहायला मिळालं.

रोहित शर्मा कार्यक्रमानंतर त्याच्या कुटुंबीयांना स्टेडियमबाहेर सोडण्यासाठी गेला होता. रोहित शर्मा आई-वडिलांना कारमध्ये बसवत असताना त्याने पाहिलं की त्यांच्या कारला डेंट आला होता. रोहित शर्माने लगेच मागे वळून त्याच्या भावाला याबाबत प्रश्न विचारला. रोहित शर्माने अगदी त्याच्या नेहमीच्या सुरात आणि शब्दात भावाची काळजीपोटी शाळा घेतली. ज्याचा व्हीडिओ तुफान व्हायरल होतोय.

रोहित शर्मा आई-वडिलांना सोडण्यासाठी कारपर्यंत आला होता. दरम्यान त्याने कारवर डेंट पाहताच त्याचा भाऊ विशालला विचारलं, “हे काय आहे?” त्याचा भाऊ म्हणाला, “रिव्हर्स घेताना झालं ते” यावर रोहितने पुन्हा विचारलं, “कोणाकडून तुझ्याकडून?” यावर रोहितचा भाऊ त्याला समजावत असतो. तितक्यात रोहित त्याच्याकडे हात करत म्हणतो,”काय लक्ष कुठे असत?” आणि पुढे जातो. यानंतर तो आई-वडिलांना कारमध्ये बसवतो.

रोहित आणि त्याच्या भावाचा हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होतोय. रोहितने नेहमीप्रमाणे आपल्या मुंबईच्या स्लँग भाषेत आणि नेहमीच्या हटके अंदाजात भावाची शाळा घेताना दिसला. रोहितच्या लहान भावाचं नाव विशाल शर्मा आहे. विशाल मीडिया आणि लाईमलाईटपासून दूर राहतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशाल हा त्याचा भाऊ रोहितची क्रिकेट अकादमी पाहतो आणि रोहितचा जो काही व्यवसाय आहे त्याचीही देखरेख करतो. विशाल हा व्यवसायाने एक बिझनेस डेव्हलपर आहे. रोहितची एक क्रिकेट अकादमी आहे जिचं पूर्ण कामकाज विशाल पाहतो.