Rohit Sharma trolled by fans for not giving Sanju Samson a chance: बार्बाडोसच्या ब्रिजटाऊन येथील केन्सिंग्टन ओव्हल येथे गुरुवारी एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पाच गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर मालिकेत १-० ने आघाडी घेतली. या सामन्यात कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि इशान किशनने शानदार प्रदर्शने केले. दरम्यान या सामन्यात सूर्यकुमार यादव अपयशी ठरला. या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मावर चाहते सडकून टीका करत आहेत.

तथापि, या सामन्यातील टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसनला संधी न दिल्याने चाहते नाराज झाले होते. मात्र त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या आणखी एका खराब प्रदर्शनानंतर संजू सॅमसनकडे दुर्लक्ष केल्याबद्दल चाहते रोहित शर्मावर संतापले असून सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. त्याचबरोबर त्याचा जुना व्हिडीओ शेअर त्याच्या ढोंगीपणाचा निषेध करत आहेत.

एकदिवसीय मालिका ही सॅमसनला भारताच्या विश्वचषक संघात आपले स्थान निश्चित करण्याची शेवटची संधी आहे. या वर्षाच्या सुरुवातीला दुखापतीमुळे स्पर्धांना मुकल्यानंतर सॅमसनला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संधी देण्यात आली आहे. जेव्हा ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत त्याला प्रथम-पसंतीचा यष्टीरक्षक म्हणून निवडले जाईल अशी अपेक्षा होती, तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

हेही वाचा – VIDEO: इंग्लंडच्या चाहत्यांनी रिकी पाँटिंगवर फेकली द्राक्षे, संतप्त माजी खेळाडूने LIVE सामन्यात दिले सडेतोड प्रत्युतर

रोहित शर्माच्या निर्णयावर चाहते संतप्त झाले असून त्यांनी सामन्यानंतरच्या टिप्पणीवर टीका केली आहे. रोहित शर्मा सामन्यानंतर म्हणाला होता की, ‘आलेल्या एकदिवसीय खेळाडूंना खेळण्यासाठी वेळ द्यायचा आहे.’ दरम्यान सूर्यकुमार पुन्हा एकदा फॉरमॅटमध्ये त्याची योग्यता सिद्ध करण्यात अपयशी ठरला. या वर्षाच्या सुरुवातीला सलग तीन सामन्यात शून्यावर बाद झाला होता. आता तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात २५ चेंडूत केवळ १९ धावा करू शकला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.