scorecardresearch

Premium

IND vs WI : सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनसाठी आखली होती खास योजना, सामन्यानंतर रोमारियो शेफर्डने केला खुलासा

India vs West Indies 5th T20: वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू रोमॅरियो शेफर्डने पाचव्या सामन्यानंतर एक खुलासा केला. तो म्हणाला की, त्याने सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनला आऊट करण्यासाठी योजना आखली होती. त्याने सॅमसनला अवघ्या १३ धावांवर बाद केले.

India vs West Indies 5th T20
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (फोटो-ट्विटर)

Shepherd had a special plan for Suryakumar and Samson : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिका रविवारी निर्णायक वळणावर होती, तेव्हा रोमॅरियो शेफर्डने ४ षटकांच्या कोट्यात ३१ धावा देत ४ बळी घेतले. त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजने पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात टीम इंडियाला टीम इंडियाला १६५ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात विंडीज संघाने हा सामना ८ विकेटने जिंकला. या सामन्यानंतर रोमॅरियोने सांगितले की, सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनला आऊट करण्यासाठी त्याने खास योजना आखली होती.

रोमारियोने पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमारला झेलबाद केले होते, पण कर्णधार रोव्हमन पॉवेलने लाँग ऑनवर संधी गमावली.त्याच्या पुढच्याच चेंडूवर त्याने संजू सॅमसनला आपल्या जाळ्यात अडकवले. संजूने थर्ड मॅनवर त्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला यष्टिरक्षक निकोलस पूरनने झेलबाद केले. यानंतर त्याने कर्णधार हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांना तंबूचा रस्ता दाखवला. या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

India vs Australia Cricket Score Updates in Marathi
IND vs AUS, World Cup 2023: मिचेल स्टार्कने किशनला बाद करत मोडला मलिंगाचा विक्रम, विश्वचषकात केला खास पराक्रम
England vs New Zealand Oneday Cricket World Cup 2023
World Cup 2023: इंग्लंडच्या संघाने केला विश्वविक्रम! वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यादाच झाली ‘या’ खास पराक्रमाची नोंद
IND vs AUS: How serious is Akshar Patel's injury Team India in search of all-rounders after the match R. Ashwin Special Video Viral
IND vs AUS: अक्षर पटेलची दुखापत किती गंभीर? टीम इंडिया अष्टपैलूच्या शोधात, सामन्यानंतर अश्विनचा स्पेशल Video व्हायरल
IND vs AUS 1st ODI Updates
IND vs AUS 1st ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुबमन गिलने मोडला बाबर आझमचा विक्रम, घरच्या मैदानावर केला खास पराक्रम

सामना संपल्यानंतर रोमॅरियो शेफर्डने सांगितले की, “संजू आणि सूर्यकुमार यादव यांच्याविरुद्ध त्याने खास योजना आखली होती. सूर्यकुमारला बाद करण्यासाठी त्याने सरळ शॉट खेळण्यासाठी प्रवृत्त केले होते. मात्र, लॉंग ऑनवर उभ्या असलेल्या कर्णधार पॉवेलकडे अवघड झेल होता, तो झेलण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न केला पण तो सुटले. पण संजूविरुद्ध माझा प्लॅन बॉल विकेटवर मारण्याचा होता.” सूर्यकुमार यादव अवघ्या २८ धावांवर खेळत असताना शेफर्डच्या षटकात त्याला जीवदान मिळाले. यानंतर त्याने ६१ धावांची खेळी केली आणि १८व्या षटकात जेसन होल्डरचा बळी ठरला. ४५ चेंडूंच्या या खेळीत त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले.

हेही वाचा – IND vs WI T20 Series: सलमान बटने टीम इंडियाला मारला टोमणा; म्हणाला, “पराभवामुळे भारताच्या…”

रोमॅरियो शेफर्ड पुढे म्हणाला, “आम्ही विजयाकडे वाटचाल केल्यामुळे मी आनंदी आहे. उत्कृष्ट फलंदाजीबद्दल निकोलस पूरन आणि ब्रँडन किंग यांचे आभार. एकदिवसीय मालिकेपासून आतापर्यंत मी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत आहे. येथे यश मिळाले आहे. तसेच हा विजय आमच्यासाठी आणि आमच्या चाहत्यांसाठी खास आहे. कारण आम्ही गेल्या २ महिन्यांत खूप कठीण प्रसंगांचा सामना करत आहोत. अशा स्थितीत भारतासारख्या संघाविरुद्ध विजयाची नोंद करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Romario shepherd reveals plans for suryakumar yadav and sanju samson in ind vs wi 5th t20 vbm

First published on: 14-08-2023 at 19:13 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
मराठी कथा ×