दोन महिन्यांपासून सुरू असलेला इंडियन प्रीमियर लीग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आज या स्पर्धेतील दुसरा क्वॉलिफायर सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. हा सामना जिंकून अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असतील. राजस्थान रॉयल्स हा दुसरा क्वॉलिफायर समाना ठरणार आहे. पहिल्या क्वॉलिफायरमध्ये राजस्थानला गुजरात टायटन्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव करून क्वॉलिफायर २ मध्ये धडक मारली आहे. दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या या सामन्यादरम्यान खेळपट्टी आणि हवामान मोठी भूमिका बजावू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील आयपीएल क्वॉलिफायर २ सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा हा या आयपीएल हंगामातील पहिलाच सामना ठरणार आहे. या सामन्यात खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल असेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या मैदानावर आतापर्यंत झालेल्या टी ट्वेंटी सामन्यांतील पहिल्या डावातील धावसंख्येची सरासरी १७४ आहे. तर, दुसऱ्या डावात धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या १६६ आहे. यावरून असे दिसते की, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याला प्राधान्य देईल.

बुधवारी (२५ मे) कोलकत्यामध्ये झालेल्या एलिमिनेटर सामन्यावर पावसाचे सावट होते. पावसामुळे खेळदेखील उशीरा सुरू झाला होता. अहमदाबादमधील सामन्यात मात्र, पाऊस अडथळा ठरणार नाही अशी शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अहवालानुसार, आज अहमदाबाद शहराचं तापमान दिवसा ४२ अंश सेल्सिअस तर रात्री २९ अंश सेल्सिअसपर्यंत असेल. दिवसा आकाश अंशतः ढगाळ असण्याची शक्यता असली तरी रात्री मात्र आकाश निरभ्र असेल.

असे असतील संभाव्य संघ

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), देवदत्त पडीक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल, ओबेड मॅकॉय

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली, फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लॉमरोर, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rr vs rcb qualifier 2 know the pitch report and probable playing xi vkk
First published on: 27-05-2022 at 14:44 IST