क्रिकेटच्या मैदानावर धुवांधर खेळीने चाहत्यांची मनं जिंकणारा भारताचा स्टार क्रिकेटर ऋतुराज गायकवाड लग्नबंधनात अडकणार आहे. अनेक मुलींच्या मनात घर करणाऱ्या ऋतुराजची विकेट मात्र त्याची होणारी पत्नी उत्कर्षा पवार हिने घेतली आहे. शनिवारी(३ जून) ऋतुराज व उत्कर्षा विवाहबंधनात अडकून त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत.

एकीकडे ऋतुराजच्या लग्नाची चर्चा सुरू असतानाच त्याच्या लग्नसोहळ्यातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऋतुराज एरा या इन्स्टाग्राम पेजवरुन ऋतुराजच्या लग्नातील हा फोटो शेअर करण्यात आला आहे. ऋतुराज व उत्कर्षाच्या लग्न समारंभाबाहेरील फलकाचा हा फोटो आहे. “काय जोडी आहे…ऋतुराज caught उत्कर्षा” असं लिहिण्यात आलं आहे. ऋतुराजच्या लग्नाची तारीखही यावर लिहिण्यात आली आहे.

हेही वाचा>> ऋतुराज गायकवाडची लगीनघाई! मेहेंदीच्या खास डिझाइनने वेधलं लक्ष, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऋतुराज व उत्कर्षाच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमधील ऋतुराज व उत्कर्षाच्या साधेपणाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता त्याच्या लग्नसोहळ्यातील फोटो व्हायरल होत आहेत.

ऋतुराजची होणारी पत्नी उत्कर्षा पवार हीदेखील एक क्रिकेटपटू आहे. उत्कर्षा २५ वर्षांची असून तिचं बालपण पुण्यात गेलं आहे. ऋतुराज व उत्कर्षा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याचं सांगितलं जात आहे.