scorecardresearch

Premium

SA vs AFG: अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले २४५ धावांचे लक्ष्य, अजमतुल्ला उमरझाईने खेळली नाबाद ९७ धावांची खेळी

Cricket World Cup 2023, SA vs AFG Match Updates: अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सर्वबाद २४४ धावा केल्या आहेत. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २४५ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

SA vs AFG World Cup 2023 Latest Score Updates in Marathi
क्षिण आफ्रिका वि अफगाणिस्तान स्कोअर (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

South Africa vs Afghanistan ICC Cricket World Cup 2023 Match Updates: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेतील ४२वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान आमनेसामने आहेत. अफगाणिस्तानने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने ५० षटकांत सर्वबाद २४४ धावा केल्या आहेत. आता दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २४५ धावांचे लक्ष्य मिळाले आहेत.

अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना अजमतुल्ला उमरझाईच्या नाबाद ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर ५० षटकांत सर्वबाद २४४ धावा केल्या. अजमतुल्ला उमरझाईने १०७ चेंडूत नाबाद ९७ धावा केल्या. या खेळीत त्याने सात चौकार आणि तीन षटकार मारले.रहमत शाह आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी २६ धावांचे योगदान दिले. रहमानउल्ला गुरबाजने २५ धावा केल्या.

Ranji Trophy Quarter Final 2024 4th Day Updates in marathi
Ranji Trophy : मध्य प्रदेशची सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत धडक! कर्नाटकला २६८ धावांची गरज, तर मुंबईकडे ४१५ धावांची आघाडी
mumbai vs assam ranji trophy match shardul's 6 wickets
शार्दुल ठाकूरचे शानदार पुनरागमन! अवघ्या २१ धावात ६ विकेट्स घेत प्रतिस्पर्धी संघाचा डाव लंच ब्रेकपूर्वीच गुंडाळला
U19 World Cup 2024 Updates in marathi
U19 WC 2024 final: भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार अंतिम सामना? टीम इंडियाला मिळणार १८ वर्षांपूर्वीचा बदला घेण्याची संधी
India won by 106 Run against England IND vs ENG 2nd Test
IND vs ENG : भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा १०६ धावांनी उडवला धुव्वा, मालिकेत १-१ ने साधली बरोबरी

दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना जेराल्ड कोएत्झीने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर लुंगी एनगिडी आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. फेहलुकवायोने एक विकेट घेतली. दोन्ही संघांसाठी हा सामना फारसा महत्त्वाचा नाही. दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानसाठी उपांत्य फेरीचे दरवाजे बंद झाले आहेत. उपांत्य फेरी गाठण्यासाठी या संघाला हा सामना ४३८ धावांनी जिंकावा लागणार होता, मात्र या संघाला एवढी मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

हेही वाचा – World Cup 2023 Final: आयसीसीच्या निमंत्रणानंतरही इम्रान खान वर्ल्ड कप फायनल का पाहू शकणार नाहीत? जाणून घ्या कारण

उपांत्य फेरीसाठी तीन संघ झाले निश्चित –

आतापर्यंत तीन संघ २०२३ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. सर्वप्रथम यजमान भारताने एकही सामना न गमावता उपांत्य फेरीत धडक मारली होती. यानंतर दक्षिण आफ्रिकेने पात्रता मिळवली. त्यानंतर पाच वेळा विश्वविजेता असलेला ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा तिसरा संघ ठरला. न्यूझीलंडने चौथ्या उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यानंतर न्यूझीलंडला उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sa vs afg match updates afghanistan team has given south africa a target of 245 runs in world cup 2023 vbm

First published on: 10-11-2023 at 18:14 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×