scorecardresearch

Premium

SA vs AFG: दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ५ गडी राखून विजय, रॅसी व्हॅन डर डुसेनने झळकावले नाबाद अर्धशतक

South Africa vs Afghanistan ICC Cricket World Cup 2023 Match Updates: अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सर्वबाद २४४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने रॅस्सी व्हॅन डर डुसेनच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर ४७.३ षटकांत ५ गडी राखून विजय मिळवला.

SA vs AFG World Cup 2023 Latest Score Updates in Marathi
दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ५ गडी राखून विजय (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

South Africa vs Afghanistan ICC Cricket World Cup 2023 Match Updates: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुक्रवारी एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेतील ४२वा सामना खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेन अफगाणिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. अफगाणिस्तानने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने ५० षटकांत सर्वबाद २४४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने रॅस्सी व्हॅन डर डुसेनच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर ४७.३ षटकांत ५ गडी राखून विजय नोंदवला.

दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. या पराभवासह अफगाणिस्तानचा वनडे विश्वचषक २०२३ मधील प्रवास संपला. मात्र, अफगाणिस्तान संघाने या स्पर्धेत चमकदार खेळ केला. या सामन्यातही अफगाणिस्तानचा संघ संघर्षानंतर पराभूत झाला. दक्षिण आफ्रिका संघाकडून रॅसी व्हॅन डर डुसेनने नाबाद अर्धशतक झळकावले. त्याने ९५ चेंडूंत ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ७६ धावांची खेळी खेळली. अफगाणिस्तानकडून राशिद आणि नबीने २-२ विकेट्स घेतल्या.

mumbai vs assam ranji trophy match shardul's 6 wickets
शार्दुल ठाकूरचे शानदार पुनरागमन! अवघ्या २१ धावात ६ विकेट्स घेत प्रतिस्पर्धी संघाचा डाव लंच ब्रेकपूर्वीच गुंडाळला
New Zealand Top On Wtc Points Table
WTC Points Table : न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय मिळवत पटकावले अव्वल स्थान, भारताला बसला फटका
U19 World Cup 2024 Updates in marathi
U19 WC 2024 final: भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार अंतिम सामना? टीम इंडियाला मिळणार १८ वर्षांपूर्वीचा बदला घेण्याची संधी
Rachin Ravindra created history by scoring a double century in Tests
SA vs NZ Test : रचिन रवींद्रने द्विशतक झळकावत रचला इतिहास! यशस्वी जैस्वालला मागे टाकत मोडले अनेक विक्रम

तत्पूर्वी अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अजमतुल्ला उमरझाईच्या नाबाद ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर ५० षटकांत सर्वबाद २४४ धावा केल्या होत्या. अजमतुल्ला उमरझाईने १०७ चेंडूत नाबाद ९७ धावा केल्या. या खेळीत त्याने सात चौकार आणि तीन षटकार मारले. रहमत शाह आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी २६ धावांचे योगदान दिले. रहमानउल्ला गुरबाजने २५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना जेराल्ड कोएत्झीने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर लुंगी एनगिडी आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. फेहलुकवायोने एक विकेट घेतली.

हेही वाचा – ICC on SLCB: श्रीलंकेला मोठा धक्का! आयसीसीने तात्काळ प्रभावाने क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व केले निलंबित

दक्षिण आफ्रिकेचा संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचे ९ सामन्यात १४ गुण झाले आहेत. मात्र, गेल्या सामन्यात भारताविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत हा संघ पुन्हा विजयी मार्गावर परतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेने विजय मिळवला आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी अफगाणिस्तानला हा सामना ४३८ धावांनी जिंकावा लागणार होता. अशा स्थितीत हा संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sa vs afg match updates south africa beat afghanistan by 5 wickets in world cup 2023 vbm

First published on: 10-11-2023 at 22:05 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×