Australian Open 2023: सबालेन्काने पटकावले पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद; पहिला सेटनंतर जबरदस्त पुनरागमन करत रायबकीनाचा पराभव केला Sabalenka beats Rybakina for Australian Open women’s title final 2023 | Loksatta

Australian Open 2023: सबालेन्काने पटकावले पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद; पहिल्या सेटनंतर जबरदस्त पुनरागमन करत रायबकीनाचा केला पराभव

Sabalenka beats Rybakina: दोघींमधील हा चौथा सामना होता. सबालेन्काने चारही सामने जिंकले आहेत. ग्रँडस्लॅम फायनलमध्ये दोघी पहिल्यांदाच आमनेसामने आले होत्या. सबालेंकाने चांगली कामगिरी करत कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले. आता रविवारी पुरुष एकेरीचा अंतिम सामना जोकोविच आणि सित्सिपास यांच्यात होणार आहे.

Australian Open 2023 womens final
आर्यना सबालेन्का (फोटो- ट्विटर)

ऑस्ट्रेलियन ओपन २०२३ च्या महिलांच्या अंतिम फेरीत आर्यना सबालेन्का हिने शनिवारी एलेना रायबकिना हिचा पराभव केला. त्याचबरोबर बेलारूसच्या २४ वर्षीय तरुणीने तिचे पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. तिने अनुक्रमे ३४ मिनिटे, ५७ मिनिटे आणि ५७ मिनिटे चाललेल्या तीन सेटमध्ये, सबालेंकाने पहिला सेट गमावला होता. परंतु तिने रायबाकिनावर ४-६, ६-३, ६-४ असा विजय मिळवत जबरदस्त पुनरागमन केले.

दोघींमधील हा चौथा सामना होता. सबालेन्काने चारही सामने जिंकले आहेत. ग्रँडस्लॅम फायनलमध्ये दोघी पहिल्यांदाच आमनेसामने आल्या होत्या. यापूर्वी, जुलै २०२१ मध्ये विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत रायबाकिना आणि सबालेन्का यांच्यात सामना झाला होता. याशिवाय, दोघीही जानेवारी २०२१ मध्ये अबू धाबी टेनिस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत आणि सप्टेंबर २०१९ मध्ये वुहान ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने आल्या होत्या.

२३ वर्षीय रायबाकिनाने आतापर्यंत तीन विजेतेपद पटकावले आहेत, त्यात एका ग्रँडस्लॅमचा समावेश आहे. रायबाकिनाने २०२२ मध्ये विम्बल्डनच्या रूपाने पहिले ग्रँडस्लॅम जिंकले. महिला एकेरीत रायबाकिनाची सध्याची रँकिंग २३ आहे. त्याचबरोबर २४ वर्षीय सबालेंकाचे हे पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. मात्र, एकेरीत त्याने ऑस्ट्रेलियन ओपनसह एकूण १२ विजेतेपदे जिंकली आहेत.

सध्या ती रँकिंगमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी, रायबकिनाचा जन्म मॉस्कोमध्ये झाला आणि २०१८ मध्ये तिने कझाकिस्तानसाठी खेळायला सुरुवात केली. मेलबर्न पार्कमध्ये तीन माजी ग्रँडस्लॅम चॅम्पियन्सना पराभूत करणारी २००१ मध्ये जेनिफर कॅप्रियाटीनंतरची रायबाकिना ही पहिली खेळाडू आहे.

तिने तीन ग्रँडस्लॅम विजेती इगा स्विटेक, २०१२-१३ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन व्हिक्टोरिया अझारेंका आणि २०१७ फ्रेंच ओपन चॅम्पियन जेलेना ओस्टापेन्को यांचा पराभव केला. याशिवाय गतवर्षी येथे उपविजेता ठरलेला डॅनियल कॉलिन्सही तिची बळी ठरली. मात्र, साबलेन्काविरुद्ध अंतिम फेरीत तिचा पराभव झाला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 18:11 IST
Next Story
Kamran Akmal: ‘तर न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका संघावर बंदी घाला…’,भारताच्या बचावासाठी पाकिस्तानी खेळाडू उतरला मैदानात