क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर याच्या नावावर क्रिकेट विश्वात सर्वाधिक धावसंख्या आणि शतकांच्या विक्रमाची नोंद आहे. सचिनच्या फलंदाजीला घाबरत असल्याचे आजवर अनेक मातब्बर गोलंदाजांनीही मान्य केले आहे. वेगवान गोलंदाजी असो वा फिरकी सचिन प्रत्येक गोलंदाजांचा उत्कृष्ट समाचार घेत असे, पण तरीही सचिनच्या मनात नेमक्या कोणत्या गोलंदाजाबद्दल भीती निर्माण व्हायची, याबद्दल सचिनला नुकतेच एका कार्यक्रमात विचारण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही विचार करत असाल की सचिनने ब्रेट ली किंवा शोएब अख्तरसारख्या एखाद्या वेगवान गोलंदाजाचे नाव घेतले असेल, पण सचिनने एका ‘पार्ट टाईम’ गोलंदाजाचे नाव घेतले आणि सर्व आश्चर्यचकीत झाले. सचिनने सांगितले की त्याला दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार हेन्सी क्रोनिएच्या गोलंदाजीची भीती वाटत असे. सचिन हिंदुस्तान लीडरशीप परिषदेत बोलत होता. तो म्हणाला की, तुम्हाला ऐकून थोडं आश्चर्य वाटेल पण, मला हेन्सी क्रोनिएने अनेकदा बाद केले होते. सचिनने सेहवागच्या फलंदाजीचेही यावेळी खूप कौतुक केले. वीरुची फलंदाजी पाहण्याची मजा काही वेगळीच होती. तुम्हाला वीरू पुढचा शॉट कुठे मारणार आहे याची काहीच कल्पना तुम्हाला नसते आणि पुढच्याच चेंडूवर आपल्याला सरप्राईज मिळावे तसे अफलातून फटके पाहायला मिळायचे, असे सचिन म्हणाला. यानंतर सचिनने वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराचे कौतुक करताना लारा एक ‘स्पेशल पॅकेज’ असल्याचे म्हटले, तर टेनिसपटू रॉजर फेडरर हा आपला आवडता क्रिकटेतर खेळाडू असल्याचे सचिन म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar reveals which bowler made him scared most on the cricket field
First published on: 05-12-2016 at 19:03 IST