भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही दोन नावं खूप महत्त्वाची आहेत. या दोघांनी १९९९ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर नव्या भारतीय संघाला दिशा देण्यात मोलाचा वाटा उचलला. मॅच फिक्सिंग सारख्या संकटातून भारताला वर आणले. भारतीय फलंदाजीची धुरा या दोघांनी समर्थपणे पेलली. सलामीवीर जोडी म्हणून या दोघांनी दमदार कामगिरी केली आणि जगावर अधिराज्य गाजवले. या जोडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एका ट्विटच्या माध्यमातून सलाम केला.

ICC ने सचिन आणि गांगुली यांचा एक एकत्रित फोटो ट्विट केला. त्या फोटोवर लिहिले की वन डे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर + सौरव गांगुली म्हणजे १७६ वेळा दमदार भागीदारी, ८,२२७ धावा आणि सरासरी ४७.५५… इतर कोणत्याही फलंदाजांच्या जोडीने अद्याप ६,००० धावांचा पल्लाही गाठलेला नाही.

या ट्विट वर सचिनने धमाल रिप्लाय दिला. “ही आठवण खूपच मस्त आहे, दादी (गांगुली). पण तुला काय वाटतं (ICC च्या नव्या नियमानुसार) ३० यार्डच्या वर्तुळाबाहेर ४ खेळाडू आणि २ नवे चेंडू असते तर आपण अजून किती धावा काढू शकलो असतो?”, असं लिहिल त्याने मस्करी करण्याचा ईमोजी वापरला. सौरव गांगुलीदेखील रिप्लायसाठी तयारच होता. गांगुलीच्या सचिनच्या ट्विट वर लगेच उत्तर दिलं. “मला वाटतं अजून ४,००० धावा आपण सहज केल्या असत्या. आणि सामन्यात दोन नवे चेंडू … ऐकला खूप मस्त वाटतंय.. कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू संपूर्ण सामनाभर सीमारेषेपार जाताना दिसतोय.” असा रिप्लाय गांगुलीच्या दिला.

दरम्यान, सध्या सौरव गांगुली BCCI अध्यक्ष आहे.