मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा मैदानात किंवा सार्वजनिक ठिकाणी कायम शांत आणि संयमी असतो. एखाद्या खेळाडूची खिल्ली उडवणे, हे त्याच्या तोंडून सहसा होत नाही. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग नेहमी आपल्या भाषिक वर्चस्वामुळे मिश्किल भाषेत काही भाषेत मांडत असतो. पण आज सचिन तेंडुलकरने भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांच्याबाबत एक विधान केले आहे.

इशांत शर्मा हा सध्या इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील एका सामन्यातील एका डावात ५ बळी टिपून त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. परदेशी खेळपट्ट्यांवर इशांतला त्याच्या उंचीचा फायदा होतो, हे साऱ्यांनाच माहिती आहे. त्याच्या या उंचीवरूनच सचिनने इशांतबाबत एक विधान केले आहे.

इशांत शर्मा याची उंच झाडावरील नारळ काढून वाढली आहे, असे सचिनने ट्विट केले आहे. पण हे ट्विट सचिनने मिश्कीलपणे केले आहे. इशांतचा आज (२ सप्टेंबर) वाढदिवस आहे. त्यामुळे त्याला सचिनने ट्विट करून शुभेच्छा दिल्या. त्या ट्विटमध्ये सचिनने असे विधान केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुझ्यासारख्या उंच माणसाला शुभेच्छा देताना मला यापेक्षा वेगळे काही सुचतच नाही, असेही त्याने ट्विट करत इशांतला त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.