भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा महेंद्रसिंह धोनीने छत्तीसगडमध्ये एका शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज केला आहे. हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल, पण हा प्रकार खरोखर घडला आहे. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये एका इंग्लिश माध्यमातील शाळेत शिक्षक पदासाठी धोनीच्या नावे अर्ज भरण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यात धोनीच्या वडिलांचे नाव म्हणून  सचिन तेंडुलकरचे नाव देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हास्यास्पद गोष्ट म्हणजे, धोनीच्या नावे भरलेला हा अर्ज मुलाखतीसाठी पात्र ठरला आहे. या शाळेत शिक्षकांची पदे भरून काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. तसेच इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकांची मुलाखत शुक्रवारी (२ जुलै) घेतली जाणार होती. शालेय प्रशासनाने यासाठी उमेदवारांची निवड करून आपल्या वेबसाईटवर ही यादी जाहीर केली होती. ज्यात धोनीचे नाव होते. ही यादी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

धोनीच्या नावे भरलेला अर्ज

 

हेही वाचा – ‘रनमशीन’ मिताली राजचे एका दिवसात दोन विश्वविक्रम!

कर्णधार म्हणून धोनी..

धोनी हा भारताकडून सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार आहे. त्याने ३३२ सामन्यांचे नेतृत्व केले. यापैकी त्याने १७८ सामन्यात विजय मिळवला आहे. धोनीने आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्जचा तीन विजेतेपदे मिळवून दिली आहेत. याशिवाय त्यांनी चॅम्पियन्स लीग टी-२०चे विजेतेपदही जिंकले आहे.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१च्या १४व्या हंगामात धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. करोनामुळे आयपीएलचा यंदाचा हंगाम २९ सामन्यानंतर स्थगित करण्यात आला. मात्र आता उर्वरित ३१ सामन्यांचे आयोजन यूएईत १९ सप्टेंबरपासून होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkars son ms dhoni applies for teachers job in chhattisgarh state adn
First published on: 04-07-2021 at 15:29 IST