साहिल तांबट व प्रसाद इंगळे यांनी प्रवीण चषक राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेतील १२ वर्षांखालील मुलांच्या गटांत आगेकूच राखली. साहिल याने तिसऱ्या मानांकित सन्मय गांधी याचा १-४, ४-१, ७-४ असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. इंगळे याने आदित्यन पिल्ले याचे आव्हान ४-१, ४-० असे लीलया संपुष्टात आणले. अर्जुन गोहाड याने पार्थ नायर याच्यावर ५-३, ४-१ अशी मात केली. सर्वेश बिरमाने या अग्रमानांकित खेळाडूने वर्धन कारकल याला ४-२, ४-२ असे सहज हरविले. मुलींच्या गटांत अग्रमानांकित अनिशा शेवते हिने अपराजित्व राखताना जोत्स्ना मदाने हिचे आव्हान ४-२, ४-० असे सहज संपुष्टात आणले. रितिका भट्टी हिने मृणाल कुरळेकर हिला ४-२, ४-१ असे नमविले. दुसऱ्या मानांकित तन्वी नायर हिने श्रद्धा इंगळे हिच्यावर ५-३, ५-४ (५-२) असे संघर्षपूर्ण लढतीनंतर हरवित उपांत्य फेरी गाठली. खुशी घोडे हिने आव्हान राखताना ऋतुजा चाफळकर हिचा ४-२, २-४, ७-५ असा पराभव केला.
संग्रहित लेख, दिनांक 29th Dec 2014 रोजी प्रकाशित
साहिल,प्रसादची आगेकूच
साहिल तांबट व प्रसाद इंगळे यांनी प्रवीण चषक राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेतील १२ वर्षांखालील मुलांच्या गटांत आगेकूच राखली.
First published on: 29-12-2014 at 02:43 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sahil tambat prasad ingle tennis