सायना नेहवाल आणि पी.व्ही.सिंधू यांनी चांगला फॉर्म कायम राखत ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत उपान्त्यपूर्व फेरी गाठली. पण पुरुष एकेरी आणि दुहेरी प्रकारात भारताचे आव्हान संपुष्टात आले.
जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असणाऱ्या सायना नेहवालने भारताच्याच पी.सी.तुलसीवर सरळ गेम्समध्ये २१-१८, २१-१५ अशी मात केली. अन्य लढतीत पी.व्ही.सिंधूने ३१ मिनिटांत थायलंडच्या निचॉन जिंदापॉनवर २१-१३, २१-७ असा विजय मिळवला. होणार आहे. पुरुषांमध्ये एका एकेरीच्या आणि दोन दुहेरींच्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला.