इंडोनेशिया सुपर सीरीज बॅडमिंटन स्पर्धेचे तीनवेळा विजेतेपद पटकावणारी भारताची फूलराणी सायना नेहवाल उद्या पासून सुरू होणाऱ्या इंडोनेशिया बॅडमिंटन या स्पर्धेचे विजेतेपद स्वत:जवळ कायम राखण्याच्या उद्देशाने खेळण्यास सज्ज आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सायनासाठी गेले काही महिने निराशाजनक राहीले आहेत. यावर्षाच्या सुरूवातीला झालेल्या ऑल इंग्लंड आणि स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यफेरीत सायनाला पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून सायनाला एकाही बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या इंडोनेशियन बॅडमिंटन स्पर्धेत सायनाच्या चांगल्या कामगिरीची अपेक्षा भारतीय बॅडमिंटन रसिकांकडून व्यक्त केली जात आहे. सायनाचा इंडोनेशियातील स्थानिक खेळाडूशी पहिला सामना आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jun 2013 रोजी प्रकाशित
इंडोनेशिया बॅडमिंटन स्पर्धेसाठी सायना सज्ज!
इंडोनेशिया सुपर सीरीज बॅडमिंटन स्पर्धेचे तीनवेळा विजेतेपद पटकावणारी भारताची फूलराणी सायना नेहवाल उद्या पासून सुरू होणाऱ्या इंडोनेशिया बॅडमिंटन या स्पर्धेचे विजेतेपद स्वत:जवळ कायम राखण्याच्या उद्देशाने खेळण्यास सज्ज आहे
First published on: 10-06-2013 at 05:45 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal ready for indonesian super series premier badminton tournament