अजय जयराम, सौरभ वर्मा यांच्यावरही भारताची भिस्त
थायलंड ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धा
गतविजेत्या सायना नेहवालला थायलंड ग्रां. प्रि.बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदाची खात्री वाटत असून, अजय जयराम व सौरभ वर्मा यांच्यावरही भारताची भिस्त आहे. या स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे.
दुखापतीमुळे सुदीरमन चषक स्पर्धेत सायनाला भाग घेता आला नव्हता. थायलंड स्पर्धेत विजेतेपद राखण्यासाठी तिने गेले काही दिवस कसून सराव केला आहे. तिला पहिल्या फेरीत चीन तैपेईच्या शिहहान हुआंग हिच्याशी खेळावे लागणार आहे. उपांत्यपूर्व फेरीपर्यंत तिला अनुकूल ड्रॉ लाभला आहे. भारताच्या पी. व्ही. तुलसी हिला तृतीय मानांकित पोर्नतिपबरोबर खेळावे लागणार आहे. अरुंधती पानतावणे हिला पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळविणाऱ्या खेळाडूचे आव्हान असेल.
पुरुषांच्या एकेरीत जयरामच्या पुढे शिसेर हिरेन रुस्ताव्हिटो याचे आव्हान आहे. सौरभ वर्मा याला पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून आलेल्या खेळाडूबरोबर खेळावे लागणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jun 2013 रोजी प्रकाशित
सायना नेहवालला जेतेपदाची खात्री
गतविजेत्या सायना नेहवालला थायलंड ग्रां. प्रि.बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदाची खात्री वाटत असून, अजय जयराम व सौरभ वर्मा यांच्यावरही भारताची भिस्त आहे. या स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. दुखापतीमुळे सुदीरमन चषक स्पर्धेत सायनाला भाग घेता आला नव्हता.
First published on: 04-06-2013 at 03:42 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal sure on victory