गतविजेत्या सायना नेहवाल आणि किदम्बी श्रीकांतसह नऊ भारतीय बॅडमिंटनपटूंनी सय्यद मोदी ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली.
सायनाने रितुपर्णा दासवर २१-१५, २१-९ असा सहज विजय मिळवला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन कांस्यपदके नावावर असणाऱ्या पी. व्ही. सिंधूने सिंगापूरच्या जिआयुआन चेनवर २१-१८, २१-१४ अशी मात केली. पी. सी. तुलसीने रशियाच्या इव्हजेनिआ डिमोव्हाला २१-७, २१-१५ असे नमवले. स्पेनच्या कॅरोलिन मारिनने मुंबईकर तन्वी लाडचे आव्हान २३-२१, १९-२१, २१-६ असे संपुष्टात आणले. प्रतिस्पर्धी मिशा झिल्बरमॅनने दुखापतीमुळे माघार घेतल्याने पारुपल्ली कश्यपला विजयी घोषित करण्यात आले. बी. साईप्रणीथने सुपन्यू अविहिंगसॅनॉनचा २१-१६, २४-२६, २१-१३ असा पराभव केला. आरएमव्ही गुरुसाईदत्तने थामासिन सिथीकोमवर २१-१६, २१-१९ अशी मात केली. एच. एस. प्रणॉयने व्लादिमीर इव्हानोव्हला २१-१२, २१-५ असे नमवले. अरविंद भट आणि सौरभ वर्माला पराभवाला सामोरे जावे लागले.
सायनाची क्रमवारीत तिसऱ्या स्थानी झेप
नवी दिल्ली : सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या सायना नेहवालने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आगेकूच केली आहे. युवा किदम्बी श्रीकांतची मात्र पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. सायनाने एका स्थानाने सुधारणा करत तिसरे स्थान गाठले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची दोन जेतेपदे नावावर असणाऱ्या पी.व्ही. सिंधूने क्रमवारीत पुन्हा अव्वल दहामध्ये स्थान पटकावताना आठवे स्थान मिळवले आहे. पुरुषांमध्ये पारुपल्ली कश्यपने एक, तर एच.एस. प्रणॉयने दोन स्थानांनी सुधारणा करत अनुक्रमे १५वे आणि १८वे स्थान मिळवले आहे. गेल्या आठवडय़ात मलेशिया ग्रां.प्रि. स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या अजय जयरामने २० स्थानांनी सुधारणा करत ४४वे स्थान पटकावले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Jan 2015 रोजी प्रकाशित
सायना, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत
गतविजेत्या सायना नेहवाल आणि किदम्बी श्रीकांतसह नऊ भारतीय बॅडमिंटनपटूंनी सय्यद मोदी ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली.
First published on: 23-01-2015 at 05:46 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina srikanth survive scares