पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने पुढील महिन्यात होणाऱ्या दुबई टेनिस स्पर्धेनंतर आपल्या टेनिस कारकीर्दीचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला आहे. दुबई टेनिस स्पर्धा ही आपल्या कारकीर्दीमधील अखेरची स्पर्धा असेल, असे सानियाने ‘डब्ल्यूटीए’ला कळवले आहे.गेल्या हंगामाच्या अखेरीस सानियाने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. पण, कोपराच्या दुखापतीमुळे तिला अमेरिकन स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्यानंतर ऑगस्ट २०२२ पासून सानिया कोर्टवर उतरलीच नाही. पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह केल्यानंतर ३६ वर्षीय सानिया गेले दशकभर दुबईत वास्तव्याला आहे. त्यामुळे येथील कोर्टवरच अखेरची स्पर्धा खेळण्याचा निर्णय सानियाने घेतला.‘डब्ल्यूटीए’च्या अखेरच्या स्पर्धेनंतरच खरे तर मी थांबण्याचा निर्णय घेतला होता. पण, कोपराच्या दुखापतीमुळे गेल्या वर्षी ऑगस्टपासून खेळता आले नाही, असे सानियाने ‘डब्ल्यूटीए’च्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

Sania Mirza Retirement : “मला नक्कीच आठवण येईल”, निवृत्तीनंतर भारतीय सानियाची भावनिक पोस्ट

सानियाने कारकीर्दीत तीन महिला आणि तीन मिश्र दुहेरी अशी सहा प्रमुख स्पर्धेत विजेतेपद मिळविली आहेत. या महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलियन स्पर्धेतही सानिया कझाकस्तानच्या अ‍ॅना डॅनिलिनाच्या साथीने खेळणार आहे. माझ्या पोटऱ्याचे स्नायू दुखावले आहेत. पण, त्याचा माझ्या निरोपाच्या कार्यक्रमावर फारसा परिणाम होणार नाही. दुबई स्पर्धेनंतर आपला निवृत्तीचा विचार आहे, असेही सानियाने या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ही स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

ग्रँडस्लॅमसह निवृत्तीचं सानिया मिर्झाचं स्वप्न भंगलं; मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात पराभव!

मी खेळाशी आणि स्वत:शी प्रामाणिक आहे. मला काय करायचे ते मी स्वत: ठरवते. त्यामुळे मला जखमी म्हणून निवृत्त व्हायचे नाही. त्यामुळे मी प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे.माझ्या पोटऱ्याचे स्नायू दुखावले आहेत. पण, त्याचा माझ्या निरोपाच्या कार्यक्रमावर फारसा परिणाम होणार नाही. – सानिया मिर्झा, टेनिसपटू

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sania mirza retires after dubai tournament amy
First published on: 08-01-2023 at 00:49 IST