भारताची सानिया मिर्झा आणि तिची अमेरिकेची सहकारी बेथनी मटेक-सँड्स यांचे सोनी खुल्या मायामी मास्टर्स टेनिस स्पर्धेतील आव्हान उपान्त्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. महिला दुहेरीच्या या लढतीत सानिया-बेथनी यांना जागतिक क्रमवारीतील अव्वल क्रमांकाच्या सारा एरानी आणि रॉबर्टा व्हिन्सी या जोडीने सरळ सेटमध्ये पराभूत केले. सातव्या मानांकित सानिया-बेथनी जोडीने प्रत्येक सेटमध्ये तीन वेळा सर्विस गमावल्यामुळे त्यांना १-६, ४-६ असा पराभव पत्करावा लागला. सानिया-बेथनी जोडीने आक्रमक सुरुवात करत पहिल्याच गेममध्ये प्रतिस्पध्र्याची सर्विस भेदली. पण एरानी-व्हिन्सी जोडीने सव्याज परतफेड करत सानिया-बेथनी यांची सर्विस मोडीत काढली. अवघ्या २४ मिनिटांत पहिला सेट जिंकत एरानी-व्हिन्सी जोडीने वर्चस्व गाजविले. दुसऱ्या सेटमध्ये सानिया-बेथनी यांनी जोमाने पुनरागमन करत पहिला गेम जिंकला. सुरेख खेळाचे प्रदर्शन करून त्यांनी दुसऱ्या सेटमध्ये ४-२ अशी आघाडी घेतली. पण त्यांना हा आनंद फार काळ टिकविता आला नाही. एरानी-व्हिन्सी जोडीने सलग चार गेम जिंकत उपान्त्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. त्यांना उपान्त्य फेरीत लिसा रेमंड आणि लॉरा रॉबसन यांच्याशी लढत द्यावी लागेल.
संग्रहित लेख, दिनांक 28th Mar 2013 रोजी प्रकाशित
सानिया-बेथनी उपान्त्यपूर्व फेरीत पराभूत
भारताची सानिया मिर्झा आणि तिची अमेरिकेची सहकारी बेथनी मटेक-सँड्स यांचे सोनी खुल्या मायामी मास्टर्स टेनिस स्पर्धेतील आव्हान उपान्त्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.

First published on: 28-03-2013 at 01:54 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saniya bethani defeted in quarter final round