scorecardresearch

Premium

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी संजू सॅमसनने केली दावेदारी पक्की, विजय हजारे ट्रॉफीत झळकावले शानदार शतक

IND vs SA series: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी, संजू सॅमसनने विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतक झळकावून चमकदार कामगिरी करून चांगले संकेत दिले आहेत.

Sanju Samson stakes claim ahead of South Africa tour hits brilliant century in Vijay Hazare Trophy
संजू सॅमसनने विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतक झळकावून चमकदार कामगिरी करून चांगले संकेत दिले आहेत. सौजन्य- (ट्वीटर)

India vs South Africa series, Sanju Samson: दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विजय हजारे ट्रॉफीमध्ये संजू सॅमसनने दमदार कामगिरी केली होती. केरळकडून खेळताना त्याने रेल्वे संघाविरुद्ध १३९ चेंडूत १२८ धावांची नाबाद खेळी खेळली. मात्र, सॅमसनची ही खेळी व्यर्थ ठरली. आपल्या शतकी खेळीने केरळला तो विजयापर्यंत नेऊ शकला नाही आणि संघाला रेल्वेविरुद्ध १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

बंगळुरू येथील किनी अ‍ॅरेना स्पोर्ट्स ग्राऊंडवर झालेल्या विजय हजारे ट्रॉफी सामन्यात संजू सॅमसनने चमकदार कामगिरी केली आहे. रेल्वेसमोर २५५ धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने केरळ संघासाठी कठीण काळात शतक झळकावले. १३९ चेंडूंचा सामना करताना सॅमसनने ६ षटकार आणि ८ चौकारांसह १३९ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने श्रेयस गोपालबरोबर चांगली भागीदारी केली, पण केरळ संघ ५० षटकात केवळ २३७/८ धावाच करू शकला. मात्र, संजू सॅमसनच्या या शानदार शतकी खेळीमुळे टीम इंडियात त्याची दावेदारी पक्की झाली आहे, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याला प्लेईंग-११मध्ये नक्कीच स्थान मिळू शकते.

U19 World Cup 2024 fastest fifty record
U19 World Cup 2024 : ६,६,६,६,४,६…दक्षिण आफ्रिकेच्या स्टीव्ह स्टॉकने ऋषभ पंतचा विक्रम मोडत रचला इतिहास
Video of umpire in Sindh Premier League goes viral
SPL 2024 : अंपायरने अपील न होताच फलंदाजाला केले बाद घोषित, पाकिस्तानमधील सामन्यातील VIDEO होतोय व्हायरल
shoaib bashir
पाकिस्तानी वंशाचा इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बशीर व्हिसाअभावी परतला मायदेशी; पदार्पण लांबणीवर
Pakistan hockey Team Coach Shahnaz Sheikh
Shahnaz Shaikh : पाकिस्तानच्या हॉकी कोचने ऑलिम्पिक पात्रता फेरीतील पराभवासाठी खराब अंपायरिंगला धरले जबाबदार

एबी डिव्हिलियर्सने कौतुक केले आहे

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, “आफ्रिकेतील परिस्थिती त्यांना मदत करेल आणि त्यांच्यासाठी ही एक चांगली मालिका असावी.” एबी डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब चॅनलवर आगामी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत सांगितले की, “संजू सॅमसनची निवड झाल्याचे पाहून खूप आनंद झाला. तो दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्टीवर चांगली मदत फलंदाजी करेल आणि इथल्या वातावरणाचा आनंद घेईल. जेव्हा तो फलंदाजी करतो तेव्हा तो बराच वेळ एक बाजू लावून धरतो. थोडी उसळी आणि स्विंग होत असलेल्या खेळपट्टीवर सर्व फलंदाजांची कसोटी लागणार आहे. मात्र, मला वाटते की संजू आणि त्याचे सहकारी चांगली कामगिरी करतील. सॅमसनची निवड झाल्याने संघात तुम्हाला विकेटकीपिंगचा अतिरिक्त पर्यायही मिळतो, ही टीम इंडियासाठी जमेची बाजू आहे.”

हेही वाचा: World Cup: विश्वचषक फायनलमध्ये टीव्हीवर का दाखवले नाही? नीरज चोप्राने केले सूचक विधान; म्हणाला, “मला जे हवे होते त्याबद्दल…”

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा संघ:ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चाहर

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanju samsons strong batting before the south africa tour scored a brilliant century avw

First published on: 05-12-2023 at 18:38 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×