Sara Tendulkar Share Pina Colada Smoothie Recipe: सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकर कायमचं चर्चेत असते. सारा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते आणि ती चाहत्यांसह ट्रॅव्हलिंग, मेकअप त्याचबरोबर दैनंदिन जीवनातील काही व्हीडिओ, फोटोदेखील शेअर करते. दरम्यान सारा तेंडुलकरने आता प्रोटीनने परिपूर्ण असलेल्या स्मूदीच्या रेसिपीचा व्हीडिओ शेअर केला आहे.
सारा तेंडुलकरने शेअर केलेला हेल्दी, हायड्रेटिंग आणि प्रोटिनने परिपूर्ण असलेली पिना कोलाडा स्मूदीचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. सारा तेंडुलकर ग्लॅमर मेकअप आणि इतर रिल्सशिवाय आता हेल्दी रेसिपीजच्या टिप्सदेखील शेअर करते. काही दिवसांपूर्वी साराने स्किनकेअरसाठी एक कमालीचं ड्रिंक करण्याचा व्हीडिओ शेअर केला होता. आता साराने जिमला जाणाऱ्यांसाठी एक स्मूदीचा व्हीडिओ शेअर केला आहे.
सारा तेंडुलकरने हेल्दी फळांची पिना कोलाडा स्मूदी रेसिपी शेअर केली आहे, रेसिपीसाठी खालीलप्रमाणे…
पिना कोलाडा रेसिपीसाठी लागणारं साहित्य
१ कप फ्रोजन आंबा आणि अननस
१ चमचा भरडलेले जवस
१ चमचा सुके किसलेले नारळ
१ चमचा पाण्यात भिजवलेले चिया सीड्स
१ स्कूप व्हॅनिला व्हे प्रोटीन
अर्धा कप नारळपाणी
थोडं नारळाचं दूध
स्मूदी बनवण्याची रेसिपी
पिना कोलाडासाठी लागणारं सर्व साहित्य एकत्र ब्लेंड करून घ्यायचं. नंतर बर्फ असलेल्या ग्लासमध्ये ही स्मूदी ओतायची आणि त्यावर सुकलेल्या नारळाचा किस आणि आंब्याच्या स्लाईसने ती सजवते.
सारा तेंडुलकरने सांगितले पिना कोलाडा स्मूदी रेसिपीचे फायदे
पिना कोलाडा स्मूदी तयार करताना सारा तेंडुलकरने याचे फायदेही सांगितले आहेत. या स्मूदीमध्ये एकावेळी २५ ग्रॅम प्रोटीन, पचनासाठी उपयुक्त असलेलं फायबर आणि इलेक्ट्रोलाईट्स आहेत. यामुळे वर्कआऊटनंतर रिकव्हरी जलद व्हायला मदत होते. त्याचबरोबर पचन सुधारतं आणि शरीर हायड्रेट राहतं.
सारा तेंडुलकर हिने क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून मास्टर्स पदवी घेतली आहे. त्यामुळे साराने डायटेशनचं पद्धतशीर शिक्षण घेतलं आहे. सध्या सारा तेंडुलकर ही सचिन तेंडुलकर फाऊंडेशनमध्ये डायरेक्टर पदावर कार्यरत आहे. याशिवाय ती फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईल या क्षेत्रातही कार्यरत आहे.