मुंबई : मोटार अपघातातून बचावलेला ऋषभ पंत पूर्णपणे तंदुरुस्त असला, तरी आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत पंतला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आणखी वेळ मिळायला हवा, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने व्यक्त केले आहे.

अपघातातून वाचल्यानंतर उपचार आणि पुनर्वसन कार्यक्रमानंतर पंत थेट ‘आयपीएल’मधूनच मैदानात उतरला आहे. भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी पंत सज्ज आहे का असे गांगुली यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘‘पंत चांगल्या लयीत आहे. त्याचे मैदानात असणेच विलक्षण आहे. यष्टिरक्षण आणि फलंदाजी या दोन्ही जबाबदारी मुळात सोप्या नाहीत. अशा कठीण प्रसंगातून बाहेर आल्यावर तर मुळीच नाही. म्हणूनच पंतला सिद्ध करण्यासाठी आणखी काही सामने गरजेचे आहेत.’’

हेही वाचा >>>IPL 2024, RR vs RCB : बटलरचं शतक कोहलीच्या शतकावर भारी, राजस्थानने साकारला बंगळुरूवर विजय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘फलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. खलील अहमद, ईशांत शर्मा, मुकेश कुमार यांची गोलंदाजी चांगली होत आहे. अभिषेक पोरेलची सुरुवात चांगली झाली आहे. आमचा आणखी एका फलंदाजाचा शोध तो पुरा करू शकेल. स्पर्धा पुढे जातील तसे रिकी भुई, कुमार कुशाग्र अशा युवा खेळाडूंना संधी मिळेल,’’ असेही गांगुली म्हणाले.

‘‘कुलदीप यादव पुर्णपणे तंदुरुस्त नाही.  त्याची तंदुरुस्ती चाचणी झाल्यानंतरच त्याच्या उपलब्धतेविषयी निर्णय घेऊ. तसेच सनरायजर्सविरुद्ध जखमी झालेल्या मिचेल मार्शसाठी आम्हाला पर्याय शोधावा लागेल. यंदाच्या ‘आयपीएल’मधून पुन्हा एकदा भारतातील गुणवत्ता एकत्रितपणे समोर येत आहे,’’ असे गांगुलीने सांगितले.