चार वेळचा जगज्जेता सेबॅस्टियन वेटेल आता पुढील मोसमापासून रेसिंग पॉइंटकडून खेळताना दिसणार आहे. सर्जियो पेरेझ याने रेसिंग पॉइंटला अलविदा केल्यानंतर वेटेलच्या घोषणेचा मार्ग मोकळा झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता अ‍ॅश्टन मार्टिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेसिंग पॉइंट संघातील वेटेलचा हा करार २०२१ पुरता असला तरी संघाने त्यापुढच्या कराराची अद्याप घोषणा केलेली नाही. ‘‘चार वेळा जगज्जेतेपद पटकावणाऱ्या वेटेलचा समावेश करताना संघातील मानसिक दृष्टिकोन बदलणार आहे,’’ असे रेसिंग पॉइंटने म्हटले आहे. रेसिंग पॉइंटचा दुसरा ड्रायव्हर सहमालक लॉरेन्स स्ट्रॉल यांचा मुलगा लान्स असणार आहे.

नव्या संघासोबत खेळण्यासाठी मी आतूर आहे. या वर्षी रेसिंग पॉइंटने केलेल्या कामगिरीमुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे. माझे भवितव्य आता उज्ज्वल असल्याचे दिसू लागले आहे. पुन्हा एकदा अग्रस्थान काबीज करण्याची माझी इच्छा आहे.

-सेबॅस्टियन वेटेल

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sebastian vettel contract with racing point abn
First published on: 11-09-2020 at 00:16 IST