राज्य हौशी मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्रीय मंडळाचे माजी सरचिटणीस रमेश दामले (वय ७७ वर्षे) यांचे सोमवारी येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक पुत्र व एक कन्या असा परिवार आहे.
महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक शिवरामपंत दामले यांच्या निधनानंतर गेली अनेक वर्षे त्यांचे पुत्र रमेश दामले यांनी मंडळाच्या कार्याचे शिवधनुष्य उचलले होते. मंडळाच्या विविध शाळा, तसेच चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय आदी संस्थांद्वारे त्यांनी शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात अनेक नवनवीन उपक्रम सुरू ठेवले होते. जलतरण, मल्लखांब, कुस्ती, बॅडमिंटन, रिंगटेनिस, अॅथलेटिक्स, क्रिकेट आदी अनेक खेळांच्या स्पर्धाचे आयोजनात त्यांचा मोठा वाटा होता. दरवर्षी २६ जानेवारी रोजी कुस्त्यांचे मैदान आयोजित करून नवोदित पहिलवानांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम ते गेली अनेक वर्षे आयोजित करीत होते. क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना शिवछत्रपती पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार, बाळंभट्ट देवधर स्मृती पुरस्कार, ज्ञानतपस्वी पुरस्कार, एल.जी.देशपांडे स्मृती पुरस्कार, कै.बापूसाहेब झंवर पुरस्कार आदी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कै.दामले यांच्यावर रात्री वैंकुठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Nov 2012 रोजी प्रकाशित
ज्येष्ठ क्रीडा संघटक रमेश दामले यांचे निधन
राज्य हौशी मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्रीय मंडळाचे माजी सरचिटणीस रमेश दामले (वय ७७ वर्षे) यांचे सोमवारी येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक पुत्र व एक कन्या असा परिवार आहे.

First published on: 27-11-2012 at 03:21 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior sports associate ramesh damle dies