जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित खेळाडू सेरेना विल्यम्स हिचे चार्ल्सटन फॅमिली सर्कल चषक टेनिस स्पर्धेतील विजेतेपदासाठी पारडे जड मानले जात आहे.
मियामी स्पर्धेत नुकतेच विजेतेपद मिळविणाऱ्या सेरेनाला येथे पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली असून दुसऱ्या फेरीत तिच्यापुढे इटलीची कॅमिला गिओर्गी हिचे आव्हान असेल. कॅमिला हिने पहिल्या फेरीत मँडी मिनेल्ला हिचा ६-४, ६-४ असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला. कारकिर्दीत १५ ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या सेरेना हिने येथे गतवर्षी विजेतेपद मिळविले होते.
डॅनिश खेळाडू कॅरोलीन वोझ्नियाकी हिला दुसऱ्या फेरीत स्पेनच्या सिल्व्हिया सोलेर एस्पिनोसा हिच्याशी खेळावे लागणार आहे. सोलेर हिने इटलीच्या फ्रान्सिस्का शियाव्हेना हिच्यावर ३-६, ६-४, ७-६ (८-६) असा विजय नोंदविला. पोर्ट रिको संघाच्या मोनिका पुईग हिने चेक प्रजासत्ताकच्या आंद्रिया हॅव्हालकोवा हिचा ६-४, ६-० असा सरळ सेट्समध्ये पराभव केला.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Apr 2013 रोजी प्रकाशित
विजेतेपदासाठी सेरेनाचे पारडे जड
जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित खेळाडू सेरेना विल्यम्स हिचे चार्ल्सटन फॅमिली सर्कल चषक टेनिस स्पर्धेतील विजेतेपदासाठी पारडे जड मानले जात आहे. मियामी स्पर्धेत नुकतेच विजेतेपद मिळविणाऱ्या सेरेनाला येथे पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली असून दुसऱ्या फेरीत तिच्यापुढे इटलीची कॅमिला गिओर्गी हिचे आव्हान असेल.

First published on: 03-04-2013 at 03:09 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Serena will win the charleston tennis competition