AUSW vs SAW T20 WC Final Match Updates: महिला टी-२० विश्वचषक २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका संघावर १९ धावांनी मात केली. त्याचबरोबर सहाव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर १५७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु प्रत्युतरात दक्षिण आफ्रिकेला ६ बाद १३७ धावा करता आल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजेतेपदाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलने २ बळी घेत इतिहास रचला. ती या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली आहे.

शबनिम इस्माईलने अन्या श्रबसोलेचा विक्रम मोडला –

शबनीम इस्माईलने महिला टी-२० विश्वचषकातील ३२ सामन्यांत ४३ बळी घेतले आहेत. या बाबतीत तिने २७ सामन्यात ४१ बळी घेणाऱ्या इंग्लंडच्या अन्या श्रबसोलेला मागे टाकले आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी ४२ सामन्यांत ४० विकेटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

शबनिम इस्माईलची क्रिकेट कारकीर्द –

३४ वर्षीय शबनीम इस्माईल उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करते. तिने १२७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १९१ विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर ११३ टी-२० सामन्यात १२३ विकेट्स घेतल्या आहेत. तिने फक्त १ कसोटी सामना खेळला आहे, ज्यात तिने 3 विकेट घेतल्या आहेत. शमनिमचा जन्म केपटाऊनमध्ये झाला.

हेही वाचा – AUSW vs SAW Final: टी-२० चा किंग ऑस्ट्रेलियाच! सलग तिसऱ्यांदा कोरले विश्वचषकावर नाव; दक्षिण आफ्रिकेचा १९ धावांनी पराभव

ऑस्ट्रेलियाची दुसऱ्यांदा विजेतेपदाची हॅट्ट्रिक –

ऑस्ट्रेलियन संघ यापूर्वी २०१०, २०१२, २०१४, २०१८ आणि २०२० मध्ये चॅम्पियन बनला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्यांदा महिला टी-20 विश्वचषकात विजेतेपदाची हॅट्ट्रिक केली आहे. यापूर्वी या संघाने २०१०, २०१२ आणि २०१४मध्ये सलग तीन वेळा विजेतेपद पटकावले होते. त्याच वेळी, आता २०१८, २०२० आणि २०२३ मध्ये विजेतेपद पटकावले आहेत. प्रथमच, एखाद्या संघाने पुरुष किंवा महिला क्रिकेटसह आयसीसी स्पर्धेत दुसऱ्यांदा विजेतेपदाची हॅट्ट्रिक केली आहे.

वॉल्व्हर्ट आणि ट्रॉयनच्या विकेट्स घेत कांगारूंनी पुनरागमन केले –

दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या तीन षटकांत ४३ धावा करायच्या होत्या. अशा स्थितीत ट्रॉयनला १२१ धावांवर जेस जॉन्सनने बोल्ड करून आपल्या संघाला पाचवे यश मिळवून दिले. ट्रॉयन २३ चेंडूत २५ धावा करून बाद झाली. दोन झटपट विकेट घेत ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा एकदा सामन्यात परतला. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या खालच्या फळीतील फलंदाजांना मोकळेपणाने धावा करू दिल्या नाहीत. शेवटी, यजमानांना २० षटकांत ६ गडी गमावून १३७ धावा करता आल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shabneem ismail breaks anya shrabsoles record to become the highest wicket taker in womens t20 world cup vbm
First published on: 26-02-2023 at 22:47 IST