Shakib Al Hasan Record: बांगलादेशचा अनुभवी खेळाडू शाकिब अल हसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पण अजूनही जगभरातील टी-२० लीग स्पर्धांमध्ये त्याच्या अष्टपैलू कामगिरीचा बोलबाला पाहायला मिळतो. सध्या तो वेस्टइंडिजमध्ये सुरू असलेली कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. या स्पर्धेतील ११ व्या सामन्यात खेळताना त्याने बारबुडा संघाकडून गोलंदाजी करताना ३ गडी बाद केले. यासह त्याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
या स्पर्धेतील ११ वा सामना सेंट किट्स अँड नेव्हिस पेट्रियट्स आणि बारबुडा या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने नवीन बिदेसी, काइल मेयर आणि मोहम्मद रिझवान यांना बाद करत माघारी धाडलं. हे ३ गडी बाद करताच त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ५०० गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. यासह तो टी-२० क्रिकेटमध्ये ५०० गडी बाद करणारा आणि फलंदाजीत ७००० धावांचा पल्ला गाठणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.
या सामन्यात गोलंदाजीला येण्यापूर्वी शाकिबच्या नावे टी-२० क्रिकेटमध्ये ४९९ गडी बाद करण्याची नोंद होती. या सामन्यात गोलंदाजी करताना १ गडी बाद करताच त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ५०० गडी बाद करण्याचा पल्ला गाठला. या सामन्यात त्याने ३ गडी बाद केले. यासह आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावे ५०२ गडी बाद करण्याची नोंद झाली. टी-२० क्रिकेटमध्ये ५०० गडी बाद करणारा तो बांगलादेशचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. तर जगातील पाचवा गोलंदाज ठरला आहे.
यासह शाकिब अल हसन हा टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना ५०० गडी बाद करणारा आणि फलंदाजी करताना ७००० धावांचा पल्ला गाठणारा जगातील पहिलाच गोलंदाज देखील ठरला आहे. शाकिबने टी-२० क्रिकेटमधील ४५७ सामन्यांमध्ये ७५७४ धाव केल्या आहेत. या विक्रमात ड्वेन ब्राव्हो सुनील गावसकर देखील शाकिब अल हसनच्या जवळ पोहोचले आहेत.
टी-२० क्रिकेटमध्ये ५०० गडी बाद करणारे आणि सर्वाधिक धावा करणारे गोलंदाज
शाकिब अल हसन- ७५७४ धावा – ५०२
ड्वेन ब्रावो- ६९७० धावा- ६३१
सुनील नरेन- ४६४९ धावा- ५९०
राशिद खान- २६६२ धावा- ६६०
इमरान ताहीर- ३७७ धावा – ५५४