ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे शुक्रवारी  निधन झाले आहे. शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे त्याच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे. शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जिथे तो सकाळी बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्यानंतर वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नानंतरही त्याला शुद्धीवर आणता आले नाही. १४५ कसोटी सामन्यात ७०८ बळी घेणाऱ्या जगातील महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नच्या निधनाने क्रिकेट जगताला धक्का बसला आहे. वॉर्नने १९४ एकदिवसीय सामन्यांमध्ये २९३ विकेट घेतल्या होत्या. १९९२ मध्ये वॉर्न पहिल्यांदा प्रकाशझोतात आला.

शेन वॉर्नने १५ वर्षांपूर्वी शेवटचा कसोटी सामना खेळला होता, पण आजही या दिग्गज लेग-स्पिनरने टाकलेला ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ क्रिकेट चाहत्यांसाठी संस्मरणीय आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ७०० हून अधिक बळी घेणारा शेन वॉर्न हा जगातील एकमेव लेगस्पिनर होता. वॉर्नने ३० वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे झालेल्या ऍशेस मालिकेतील कसोटी सामन्यात इंग्लंडचा फलंदाज माईक गॅटिंगने क्लीन बोल्ड करून जगाला थक्क केले होते. वॉर्नने टाकलेला जादूई चेंडू गॅटिंगच्या ऑफ-स्टंपवर आदळण्याआधी ९० अंशात वळला होता.

Son Post Father marksheet
वडिल म्हणायचे, “पोरा परिक्षेत पास हो”, मुलानं वडिलांचीच दहावीची मार्कशीट केली व्हायरल; VIDEO पाहून व्हाल हसून लोटपोट
Double MA and PhD Lady Selling tea on road
MA, Ph.D ची डिग्री असूनही विकतेय रस्त्यावर चहा, महिलेनी सांगितले कारण, VIDEO Viral
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
a father beat child for his betterment by his shoes watch viral video of fathers love
लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”

शेन वॉर्नने १९९२ मध्ये भारताविरुद्ध सिडनी येथे कसोटी पदार्पण केले होते. पहिल्या कसोटीत तो फार काही करू शकला नाही आणि फक्त एक विकेट घेऊ शकला. १९९३ च्या ऍशेस मालिकेपूर्वी, वॉर्न ११ कसोटीत ३२ बळी घेत लेग-स्पिनर मानला जात होता. वॉर्नने १९९२च्या बॉक्सिंग-डे कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध ७/५२ अशी गोलंदाजीची कामगिरी केली होती.

दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन

वॉर्नचा खरा खेळ १९९३ च्या ऍशेस मालिकेत समोर आला. त्याने पहिल्या अॅशेस मालिकेत पाच कसोटी सामन्यात २९ विकेट्स घेतल्या. १९९३ च्या ऍशेस कसोटीच्या पहिल्या षटकात, वॉर्नने खेळपट्टीचा फायदा घेतला आणि माईक गॅटिंगच्या लेग-स्टंपच्या बाहेर खेळपट्टीवर खेळलेला एक सुरेख लेग स्पिन टाकला, पण तो ऑफ-स्टंपवर आदळला.

एका मुलाखतीत शेन वॉर्नने सांगितले होते की, मी असा चेंडू टाकू शकतो असे मला कधीच वाटले नव्हते. मी फक्त लेगब्रेक टाकण्याचा प्रयत्न करत होता, पण चेंडू ९० अंशात फिरला. ते अविश्वसनीय होते. वॉर्नने ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ हा त्याच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण असल्याचेही सांगितले.