Shikhar Dhawan got emotional while talking about Zoravar : भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन त्याचा मुलगा जोरावरपासून दूर राहतो. पत्नी आयशापासून घटस्फोट घेतल्यानंतर धवनचा मुलगा आईबरोबर राहतो. धवन अनेकदा आपल्या मुलाबद्दल बोलतो. काही दिवसांपूर्वीच धवनने आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त एक भावनिक पोस्ट केली होती. आता धवन पुन्हा एकदा आपल्या मुलाबद्दल बोलताना भावुक झाला आहे. यावेळी तो म्हणाला की त्याला मिठी मारावी अशी माझी इच्छा आहे.

शिखर धवनने पुन्हा एकदा त्याचा मुलगा जोरावरबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. गेल्या वर्षी त्याच्या मुलाच्या वाढदिवशी शिखर धवनने एक भावनिक इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली होती. हे वाचून चाहत्यांचेही डोळे पाणावले होते. शिखर धवनने आता एका पॉडकास्टमध्ये त्याचा मुलगा जोरावरबद्दल एक हृदयस्पर्शी गोष्ट सांगितली आहे.

obsessed girlfriend with a love brain disease viral
Viral : तरुणीला झाला ‘प्रेमाचा’ आजार! प्रियकराला करायची १०० मेसेज! डॉक्टर म्हणाले, “हिला…”
What Supriya Sule Said?
“जो तुम्हाला धमक्या देतो आहे, त्याला..”, सुप्रिया सुळे भाषणात नेमकं काय म्हणाल्या?
According To Rohit Shikhar And Rishabh Are Dirty
VIDEO : रोहितने सांगितलं ‘या’ दोन क्रिकेटपटूंसह कधीच रूम शेअर करणार नाही; म्हणाला, “ते दोघे राहतात अगदी गचाळ…’
siddharth opens up about secret engagement with aditi rao hydari
अदिती राव हैदरीशी सिद्धार्थ कधी करणार लग्न? गुपचूप साखरपुडा उरकल्यावर अभिनेत्याचा खुलासा; म्हणाला, “याचा निर्णय…”

“मी माझे कर्तव्य करत आहे” –

‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे पॉडकास्ट’शी बोलताना शिखर धवन म्हणाला, “माझ्या मुलाला मिठी मारावी अशी माझी इच्छा आहे. मी त्याला रोज मेसेज पाठवतो, तो त्याला मिळतो की नाही हे मला माहीत नाही. मी एक वडील आहे आणि मी माझे कर्तव्य करत आहे. मला त्याची आठवण येते. मला वाईट वाटते, पण मी त्याच्याविना राहायला शिकलो आहे.”

हेही वाचा – IND vs ENG Test : टीम इंडियासाठी वाईट बातमी! रवींद्र जडेजा संपूर्ण मालिकेतून होऊ शकतो बाहेर, जाणून घ्या कारण

काही काळापूर्वी धवनने त्याच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट लिहिली होती की, “तुला पाहून एक वर्ष झाले आहे, आणि आता, मला सर्वत्र ब्लॉक करून तीन महिने झाले आहेत, त्यामुळे तुला शुभेच्छा देण्यासाठी तो फोटो पोस्ट करत आहे.” म्हणजेच धवनला त्याच्या मुलाला भेटून एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे.

हेही वाचा – Rishabh Pant : ‘मला वाटले होते या जगातील माझी वेळ…’, ऋषभने कार अपघातावर दिली प्रतिक्रिया

शिखर धवनची क्रिकेट कारकीर्द –

भारताकडून तिन्ही फॉरमॅट खेळणारा शिखर धवन काही काळापासून भारतीय संघाबाहेर आहे. डिसेंबर २०२२ मध्ये त्याने भारतासाठी शेवटचा सामना खेळला, जो बांगलादेशविरुद्धचा एकदिवसीय सामना होता. त्यानंतर धवन संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. धवनने आत्तापर्यंत ३४ कसोटी, १६७ वनडे आणि ६८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत २३१५ आणि वनडे ६७९३ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या ६६ डावात २७.९२ च्या सरासरीने आणि १२६.३६ च्या स्ट्राईक रेटने १७५९ धावा केल्या आहेत.