भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिका आणि कर्णधाराने बाळगलेली गुप्तता यामुळे भारतीय संघातील एकही खेळाडू विराट-अनुष्काच्या विवाह सोहळ्यात उपस्थित राहू शकला नाही. मात्र, विराट-अनुष्काच्या विवाह झाल्यानंतर संघातील सहकाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विराट-अनुष्काला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. भारतीय संघाच्या डावाला सुरुवात करणाऱ्या शिखर धवनपासून शुभेच्छा देण्यास सुरुवात झाली. शिखर धवनने विराट-अनुष्का यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत दोघांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे धवनसाठी हा क्षण अविस्मरणीयच असल्याचे दिसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या फोटोमध्ये विराट-अनुष्का एका बाईकवर तर दुसऱ्या बाईकवर धवनसह त्याची पत्नी आएशा आपल्या मुलाला घेऊन बसल्याचे दिसते. विराट-अनुष्काच्या प्रेम प्रकरणाची चर्चा रंगत असताना दोघांचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, धवनने शेअर केलेला फोटो पहिल्यांदाच समोर आला आहे.
शिखर धवन आणि आयेशा यांनी देखील प्रेम विवाह केला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या धवन आणि आएशाची ओळख ही फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. आएशा ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये राहणारी असून ती बंगाली आहे. दोन्ही भारतीय खेळाडुंनी जोडीने काढलेल्या जुन्या फोटोला चांगलीच लोकप्रियता मिळत आहे.

विराट-अनुष्का यांचा विवाह सोहळा इटलीमध्ये पार पडला. ही जोडी मायदेशी परतल्यानंतर रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे. २१ डिसेंबरला दिल्ली आणि २६ डिसेंबरला मुंबईमध्ये खास मेजवाणी देण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी होणाऱ्या या पार्टीत भारतीय संघातील सर्व खेळाडू सहभागी होण्याची शक्यता आहे. यावेळी शिखर धवन दिल्लीतील पार्टीत निश्चितच सहभागी झाल्याचे पाहायला मिळू शकते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shikhar dhawan share photo with virat kohali and anushka sharma
First published on: 12-12-2017 at 16:58 IST