शिवाजी पार्क जिमखान्याच्या निवडणुकीमध्ये रंग चढू लागले असून हेगडे गटामधून अध्यक्षपदासाठी रिंगणात असलेले भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांना खानोलकर-मुरकर गटाने पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता अध्यक्षपदासाठी वाडेकर आणि भारताचे माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे यांच्यामध्ये थेट सामना होणार आहे. वाडेकर यांच्याबरोबर खानोलकर-मुरकर गटाने समाधान सरवणकर, श्रेयस खानोलकर, राजीव अढळराव, शेखर सुर्वे, योगेश पोवार यांनाही पाठिंबा दिला आहे.
‘आमचे आणि प्रवीण अमरे यांच्याशी काही वैर नाही. पण घरामध्ये वरिष्ठ व्यक्तीचा मान आपण ठेवत असतो. त्यामुळेच आम्ही वाडेकर यांना पाठिंबा देत आहोत. यामध्ये कोणतेच राजकारण नाही,’’ असे संजीव खानोलकर यांनी सांगितले.
खानोलकर-मुरकर गटाने या वेळी जाहीरनामा जाहीर करताना आतापर्यंत जिमखान्यासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या गटाचे उमेदवारही जाहीर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खानोलकर-मुरकर गटाचे उमेदवार
उपाध्यक्ष : विकास दुबेवार, कार्याध्यक्ष : संजय शेटे, उपकार्याध्यक्ष : दीपक मूरकर, उपाध्यक्ष : रुचिर भट्ट, विश्वस्त : विनायक साने, उमेश कुलकर्णी, सुधीर घासकवडी, चिटणीस : संजीव खानोलकर, साहाय्यक चिटणीस : महेंद्र ठाकूर, खजिनदार फाल्गून देसाई, टेनिस चिटणीस : योगेश परुळेकर, टेनिस सदस्य : चंद्रकांत कुलकर्णी, कार्ड चिटणीस : विक्रम कुलकर्णी, इंडोर खेळ चिटणीस : राजेंद्र सबनिस, कार्यकारी सदस्य : समीर भोळे आणि श्रीकांत गोरे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivaji park gymkhana elections
First published on: 03-08-2015 at 01:18 IST