Asia Cup 2025 Suryakumar Yadav dressing room video sparks buzz: भारतीय संघाने आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने दणदणीत पराभव केला आणि जेतेपद आपल्या नावे केलं. भारताचे गोलंदाज आणि तिलक वर्मासह शिवम दुबे, संजू सॅमसन यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. तिलक वर्माने भारतीय संघाचा डाव सावरत संघाला विजय मिळवून देतच माघारी परतला. टीम इंडियाने या सामन्यानंतर इम्पॅक्ट प्लेअरचं मेडल कोणाला दिलं, पाहूया.
कुलदीप यादवच्या ४ विकेट्सच्या बळावर भारताने पाकिस्तानला १४६ धावांवर प्रथम गोलंदाजी करताना सर्वबाद केलं. कुलदीपसह बुमराह, वरूण आणि अक्षरने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. यानंतर १४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवात फारच खराब झाली आणि संघाने झटपट ३ विकेट्स गमावले. यानंतर तिलक वर्माने संजू सॅमसनच्या साथीने सावधतेने आपला डाव साकारला. तिलक आणि संजूने अर्धशतकी भागीदारी रचली
संजू बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे फलंदाजीला आला आणि त्याने मोठे फटके खेळत तिलक वर्माला चांगली साथ दिली. दुबेने २२ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह ३३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. याशिवाय हार्दिक पंड्या अंतिम सामन्याला मुकलेला असताना शिवम दुबेने गोलंदाजीची सुरूवात केली आणि चांगली कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीसाठी दुबेला इम्पॅक्ट प्लेअरचा पुरस्कार देण्यात आला.
भारताच्या विजयानंतर ड्रेसिंग रूममधील व्हीडिओ व्हायरल
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हीडिओच्या सुरूवातीला भारताच्या विजयानंतरच्या क्षणांचे काही फुटेज आहेत. यामध्ये भारतीय संघ विजयाचं सेलिब्रेशन करतानाही दिसत आहे. याबरोबरच आशिया चषकाच्या स्पर्धेत टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये नवीन प्रथा सुरू केली आहे. भारताच्या सपोर्ट स्टाफमधील एकेक जण प्रत्येक सामन्यासाठी विजेत्याचं नाव घोषित करत मेडल दिलं जात आहे.
भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील फिजिओथेरेपिस्ट कमलेश यांनी अंतिम सामन्याचा इम्पॅक्ट प्लेअर जाहीर केला. शिवम दुबे पुरस्कारने मिळाल्यानंतर म्हणाला, माझ्यासाठी हे मेडल खूप महत्त्वाचं आहे. मला संधी दिल्याबद्दल कोच गौतम गंभीर आणि कर्णधाराचे आभार. पहिलं षटक टाकायचं म्हणजे मला खरंच दडपण आलं होतं, १०० टक्के घाबरलो होतो मी, खोट बोलणार नाही. तितक्यात सूर्या त्याला म्हणाला, “अरे सगळं नाही सांगायचंय…”
दुबे पुढे बोलताना म्हणाला, सर्वांनीच मला पाठिंबा दिला. सामन्यात गोलंदाजी टाकायला गेलो तेव्हा थोडं दडपण कमी झालं, कारण चेंडू टाकण्यावर पूर्ण लक्ष होतं. खूप मजा आली आणि मेडलसाठी खूप थँक्यू. यानंतर सर्वांनीच टाळ्या वाजवत त्याचं कौतुक केलं.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हीडिओच्या सुरूवातीला भारताच्या विजयानंतरच्या क्षणांचे काही फुटेज आहेत. यामध्ये भारतीय संघ विजयाचं सेलिब्रेशन करतानाही दिसत आहे. याबरोबरच आशिया चषकाच्या स्पर्धेत टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये नवीन प्रथा सुरू केली आहे. भारताच्या सपोर्ट स्टाफमधील एकेक जण प्रत्येक सामन्यासाठी विजेत्याचं नाव घोषित करत मेडल दिलं जात आहे.