Asia Cup 2022 : आशिया चषकात आज श्रीलंका विरुद्ध बांगलादेश असा सामना रंगणार आहे. आज संध्याकाळी ७.३० वाजता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडीअमवर हा सामना खेळवला जाईल. दोन्ही संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. आज जो संघ जिंकेल, त्याच्यासाठी सुपर ४ चा मार्ग खुला होणार आहे. तर हा हारणारा संघ स्पर्धेबाहेर जाईल.
हेही वाचा – “म्हणजे केएल राहुलने खेळू नये असं तुम्हाला म्हणायचं आहे का?”; सूर्यकुमार यादवचे पत्रकारांना मजेशीर उत्तर
दोन्ही संघानी आपला पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध खेळला आहे. मात्र, दोघांनाही पहिल्या सामन्या हार पत्करावी लागली होती. अफगाणिस्ताने श्रीलंकेला ८ गडी राखून तर बांगलादेशला ७ गडी राखून पराभूत केले होते.
दरम्यान आशिया चषकात आतापर्यंत बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात १२ सामने झाले आहेत. यापैकी श्रीलंकेने ८ तर बांगलादेशने ३ सामने जिंकले आहेत.
हेही वाचा – “म्हणजे केएल राहुलने खेळू नये असं तुम्हाला म्हणायचं आहे का?”; सूर्यकुमार यादवचे पत्रकारांना मजेशीर उत्तर
प्लेईंग ११ ( अंदाजे )
श्रीलंका : दनुष्का गुनाथिलाका, पाथूम निसांका, कुसल मेंडिस ( यष्टीरक्षक ), चारिथ असालंका, भानुका राजपक्षे, दासुन शानाका ( कर्णधार ), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना, दिलशान मदुशंका, मथीशा पाथिराना
बांगलादेश : मोहम्मद नईम, अनामूल हक, शकीब अल हसन ( कर्णधार ) अफिफ हुसैन, मुशफिकूर रहीम ( यष्टीरक्षक ), मोसाद्देक हुसेन, महमुदुल्लाह, महेदी हसन, मोहम्मद सैफुद्दीन, तस्किन अहमद, मुस्तफिजूर रहमान