India vs Netherlands ICC Cricket World Cup 2023 Match Updates: भारताचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने नेदरलँड्सविरुद्ध शेवटच्या साखळी सामन्यात अर्धशतक झळकावले. या सामन्यात शुबमन गिल ज्या पद्धतीने खेळत होता, त्यावरून तो मोठी धावसंख्या करेल असे वाटत होते, पण त्याचा एक झेल थेट सीमारेषेवर घेतला गेला आणि तो बाद झाला. या सामन्यात गिल अत्यंत आक्रमक पद्धतीने फलंदाजी करताना ५१ धावांच्या खेळी केली. या खेळच्या जोरावर शुबमन गिलने रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढला. त्याचे या विश्वचषकातील हे तिसरे अर्धशतक ठरले.

शुबमन गिलने ३० चेंडूत झळकावले अर्धशतक –

या सामन्यात शुबमन गिलने अवघ्या ३० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात त्याने ३२ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या. या कालावधीत त्याचा स्ट्राइक रेट १५९.३८ होता. शुबमन गिलने या सामन्यात टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने कर्णधारासोबत पहिल्या विकेटसाठी १०० धावांची भक्कम भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले.

Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: रोहित शर्माने तोडला पोलार्डचा मोठा विक्रम, मुंबईसाठी हा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: शुबमन गिलच्या नावे आयपीएलमध्ये अजून एक मोठा रेकॉर्ड; रोहित, विराट, रहाणे सर्वांनाच टाकलं मागे

शुबमन गिलने मोडला रोहित शर्माचा विक्रम –

शुबमन गिलने ५१ धावांची खेळी खेळून आपल्या या कॅलेंडर वर्षात १५०० धावा पूर्ण केल्या. त्याचबरोबर एका कॅलेंडर वर्षात भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पाचव्या स्थानावर आला आहे. यापूर्वी हे स्थान रोहित शर्माकडे होते, ज्याने २०१९ मध्ये एका कॅलेंडर वर्षात १४९० धावा केल्या होत्या. भारतासाठी एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्याने १९९८ मध्ये १८९४ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – IND vs NED, World Cup 2023: रोहित शर्माने मोडला इऑन मॉर्गनचा विक्रम, सचिन तेंडुलकरच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी

एका कॅलेंडर वर्षात एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –

१८९४ धावा – सचिन तेंडुलकर (१९९८)
१७६७ धावा – सौरव गांगुली (१९९९)
१७६१ धावा – राहुल द्रविड (१९९९)
१६११ धावा – सचिन तेंडुलकर (१९९६)
१५०० धावा – शुबमन गिल (२०२३)
१४९० धावा – रोहित शर्मा (२०१९)
१४६० धावा – विराट कोहली (२०१७)
१४२५ धावा – सचिन तेंडुलकर (२००७)