Shubman Gill to Break Sir Don Bradman Record: भारत वि. इंग्लंड यांच्यात आजपासून म्हणजे १० जुलैपासून तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. हा कसोटी सामना लॉर्ड्सच्या क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. शुबमन गिलने कसोटी कर्णधारपद मिळाल्यानंतर पहिल्याच सामन्यात शानदार शतक झळकावलं आहे. तर दुसऱ्या सामन्यात त्याने द्विशतक करत अनेक मोठमोठे विक्रम मोडले आहेत. आता तो या कसोटी मालिकेत दिग्गज क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांचा सर्वात मोठा आणि जुना विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे.

कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने शतक झळकावले. त्यानंतर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने द्विशतक झळकावले. २६९ धावा करून तो कसोटीत सर्वात मोठी खेळी करणारा भारतीय कर्णधार बनला. त्यानंतर सामन्याच्या दुसऱ्या डावात गिलने १६१ धावांची उत्कृष्ट खेळी केली. दुसऱ्या कसोटी सामन्यात ४३० धावांसह, तो एका कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला.

शुबमन गिलला कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनण्याची संधी आहे. आतापर्यंत हा विक्रम ऑस्ट्रेलियाचे महान सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी ८८ वर्षांपूर्वी १९३६-३७ च्या अ‍ॅशेस मालिकेत हा विक्रम केला होता. इंग्लंडविरुद्धच्या त्या ५ सामन्यांच्या मालिकेत ब्रॅडमन यांनी ९० च्या सरासरीने ८१० धावा केल्या होत्या. यामध्ये ३ शतकं आणि एक अर्धशतक होते.

भारतीय क्रिकेटमध्ये एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. १९७८ मध्ये वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्यातील कसोटी मालिकेत गावस्कर संघाचे कर्णधार होते. गावस्कर यांनी ६ कसोटी सामन्यांच्या ९ डावात ९१.५० च्या सरासरीने ७३२ धावा केल्या. या मालिकेत त्यांनी ४ शतकं केली होती.

शुबमन गिल याशिवाय डॉन ब्रॅडमन यांचा अजून एक विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे. डॉन ब्रॅडमन यांनी एका मालिकेत सर्वाधिक ९७४ धावा करण्याचा विक्रम केला होता. गिलला ब्रॅडमन यांचा हा विक्रम मोडण्यासाठी फक्त ३९० धावांची गरज आहे. याशिवाय कर्णधार म्हणून सर्वात जलद एक हजार धावा करण्याचा विक्रम गिल करू शकतो, हा विक्रम आपल्या नावे करण्यासाठी त्याला ४१५ धावांची गरज आहे. ब्रॅडमन यांनी ११ डावांमध्ये एक हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला होता. तर गिल हा विक्रम पुढील सहा डावांमध्ये मोडू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुबमन गिल भारतीय क्रिकेटपटू म्हणून अनेक विक्रम करण्याच्या तयारीत

  • एका कसोटी मालिकेत भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा सुनील गावस्करांचा (७३२) विक्रम मोडण्यासाठी गिलला १४८ धावांची गरज आहे.
  • इंग्लंडविरूद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा यशस्वी जैस्वालचा विक्रम मागे टाकण्यासाठी त्याला १२७ धावांची गरज आहे. जैस्वालने इंग्लंडविरूद्ध एका कसोटी मालिकेत १२७ धावा केल्या होत्या.
  • इंग्लंडमधील कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा राहुल द्रविड यांचा विक्रम मोडण्यासाठी गिलला १८ धावांची गरज आहे.
  • इंग्लंडविरूद्ध भारतीय कर्णधार म्हणून मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडण्यासाठी त्याला ९१ धावांची गरज आहे. हा विक्रम कोहलीच्या नावावर होता, ज्याने ६५५ धावा केल्या होत्या.