Shubman Gill Sara Tendulkar Spotted in London Together: भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यामधील दोन सामने झाले असून हेडिंग्ले कसोटी इंग्लंडने तर बर्मिंगहम कसोटी भारताने जिंकली आहे. यामुळे कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. भारताच्या कसोटी संघाची जबाबदारी सध्या शुबमन गिलच्या खांद्यावर आहे. यादरम्या शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर यांचा लंडनमधील युवराज सिंग फाऊंडेशनच्या कार्यक्रमातील फोटो व्हायरल होत आहे.

८ जुलै २०२५ रोजी लंडनमध्ये, माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगने त्याच्या You We Can फाउंडेशनसाठी एका चॅरिटी डिनरचे आयोजन केले होते, ज्यामध्ये क्रिकेट जगतातील अनेक मोठ्या व्यक्ती उपस्थित होत्या. कर्करोगाबद्दल जागरूकता आणि उपचारांसाठी निधी उभारण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर लंडनमध्ये एकत्र दिसल्याचा फोटो व्हायरल होतोय. हे दोघेही युवराज सिंगच्या युवीकॅन फाऊंडेशनच्या चॅरिटी कार्यक्रमात एकत्र होते. जिथे क्रिकेट सचिन तेंडुलकरसह क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज उपस्थित होते.

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल संपूर्ण संघासह या डिनरला उपस्थित होता. दरम्यान, त्याचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर त्याच्याबरोबर दिसत होती.

युवराज सिंगने २०११ मध्ये कर्करोगाशी झुंज देत निरोगी झाल्यानंतर स्थापन केलेली YouWeCan फाउंडेशन ही संस्था कर्करोगाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आणि रुग्णांना आर्थिक मदत देण्यासाठी काम करते. लंडनमधील या चॅरिटी डिनरचा उद्देश फाउंडेशनसाठी निधी उभारणे हा होता. या कार्यक्रमातील सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला ज्यामध्ये शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर एकत्र दिसत होते.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये शुबमन गिल हसताना दिसत आहे आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर त्याच्या समोर बसली आहे. हा फोटो गिल संघासह डिनरसाठी आला होता तेव्हाचा असल्याचे सांगितले जात आहे आणि सारा आधीच तिथे उपस्थित होती. सचिन तेंडुलकर आणि त्याचं संपूर्ण कुटुंब या कार्यक्रमासाठी उपस्थित होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
हेही वाचा

शुबमन गिलचं नाव सारा तेंडुलकरशी अनेकदा जोडलं गेलं आहे. एकेकाळी त्यांच्या अफेअरच्या अफवा चर्चेत होत्या. दोघेही पूर्वी सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करायचे. ते एकमेकांच्या पोस्टवर लाईक आणि कमेंटही करायचे. पण दोघांनीही या अफवांवर कधीही वक्तव्य केलं नाही. दरम्यान शुबमन गिलने काही दिवसांपूर्वी तो सिंगल असल्याचेही सांगितलं होतं.