भारताची उदयोन्मुख खेळाडू पी.व्ही.सिंधू हिने मकाऊ ग्रां.प्रि.बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. तिने उपांत्य फेरीत चीनच्या क्विन जिनयिंग हिच्यावर २१-१३, १८-२१, २१-१९ असा रोमहर्षक विजय नोंदविला.
अव्वल मानांकन मिळालेल्या सिंधूला जिनयिंगविरुद्ध विजय मिळविताना चिवट झुंज स्वीकारावी लागली. तिने ड्रॉपशॉट्स व अचूक सव्र्हिसचा बहारदार खेळ करत विजयश्री खेचून आणली. पहिली गेम तिने चांगल्या फरकाने घेतली तथापि दुसऱ्या गेममध्ये निर्णायक क्षणी तिला परतीच्या फटक्यांवर नियंत्रण ठेवता आले नाही. ही गेम तिने गमावली. तिसऱ्या गेममध्ये विलक्षण चुरस पाहावयास मिळाली. अटीतटीने चाललेली ही गेम सिंधूने स्मॅशिंगच्या आक्रमक फटक्यांच्या जोरावर जिंकली व अंतिम फेरी निश्चित केली. सिंधूला विजेतेपदासाठी कॅनडाच्या ली मिशेली हिच्या आव्हानास तोंड द्यावे लागणार आहे. मिशेली हिने युई यिनपिंग हिच्यावर २१-१५, २१-१६ असा आश्चर्यजनक विजय नोंदविला.
संग्रहित लेख, दिनांक 1st Dec 2013 रोजी प्रकाशित
सिंधू अंतिम फेरीत
भारताची उदयोन्मुख खेळाडू पी.व्ही.सिंधू हिने मकाऊ ग्रां.प्रि.बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. तिने उपांत्य फेरीत चीनच्या क्विन जिनयिंग
First published on: 01-12-2013 at 04:37 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sindhu cruises into macau open final