भारत व न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या क्रिकेट कसोटी सामन्याबाबत सट्टेबाजी करणाऱ्या सहा जणांना तिरुपूर जिल्ह्य़ातील कांगेयाम येथे पोलिसांनी अटक केली. कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारत तीनशे धावांपलीकडे पोहोचणार की नाही याबाबत सट्टेबाजी केली जात होती. यात हजार रुपये रोख, तसेच मोबाइल्स आदी जप्त करण्यात आले आहेत.