Asia Cup 2022 : आशिया चषकात आज झालेल्या श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशवर २ गडी राखत दणणीत विजय मिळवला. दोन्ही संघासाठी ‘करो या मरो’चा परिस्थिती असणाऱ्या या सामन्यात श्रीलंकेने अखेर बाजी मारली. दरम्यान, या विजयानंतर सुपर ४ मध्ये पोहोचणारा श्रीलंका हा तिसरा संघ ठरला आहे. तर बांगलादेशचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. आशिया चषकाचे यंदाचे यजमानपदे श्रीलंकेकडे होते. मात्र, तेथील अशांत परिस्थितीमुळे ही स्पर्धा दुबईमध्ये आयोजित करण्यात आली. दरम्यान, बऱ्याच कालावधीनंतर विजयाने श्रीलंकन नागरिकांच्या मनात देशाप्रती आनंदाची भावना उचंबळून आली असेल.

हेही वाचा – Asia Cup 2022: मॅच हरल्यावर हॉंगकॉंग क्रिकेट संघाने केलेली ‘ही’ कृती पाहून कोहली झाला खुश, म्हणाला “तुम्ही..

तत्पूर्वी, श्रीलंकेने आज नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशच्या डावाची सुरूवात थोडी वाईट राहिली. सलामीला आलेला शब्बीर रहमान स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर मेहडी हसन मिर्झा आणि कर्णधार शकीब अल हसनने ३९ धावांची भाागीदारी करत बांगादेशचा डाव सावण्याचा प्रयत्न केला. बांगादेशतर्फे सर्वाधिक धावा अफीफ होसीने (३९ ) तर मेहडी हसन मिर्झाने ( ३८ ) धावा काढल्या. तर श्रीलंकेतर्फे वानिंदू हसरंगा आणि चमिका करुणारत्ने यांनी प्रत्येकी दोन तर दिलशान मधुशंकाने, महिश तीक्षणा आणि असिस्था फर्नांडो यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतला.

हेही वाचा – …म्हणून रोहित शर्मावर भडकला गौतम गंभीर; म्हणाला, “ऋषभ पंतला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीलंकेच्या डावाची सुरूवात थोडी चांगली राहिली. समामीला आलेल्या पथुम निसंका आणि कुशाल मेडींस यांनी ४५ धावांची सलामी दिली. मात्र, त्यानंतर बांगलादेशच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला चांगलेच अडचणी आणले होते. नऊ षटकांनंतर ४ बाद ७७ अशी धावसंख्या असताना कर्णधार दासून शनाकासह सलामीवीर कुसल मेंडिसने संघाचा डाव सावरण्या प्रयत्न केला. अखेर शेवटच्या षटकात श्रीलंकेला ८ धावांची गरज असताना दुसऱ्या चेंडूवर असिथा फर्नांडोन चौकार मारला, तर तिसऱ्या चेंडूवर दोन धावा घेत, धावसंख्या बरोबरीत आणली. मात्र, तिसरा चेंडू नो बॉल पडल्याने श्रीलंकेला सहज विजय मिळाला. दरम्यान, श्रीलंकेकडून कुशाल मेडीसने सर्वाधिक ६० तर कर्णधार दुसान शनाकाने ४५ धावा काढत श्रीलंकेच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.