scorecardresearch

Premium

SL vs PAK, Asia Cup: ‘करो या मरो’ सामन्यात पाकिस्तानने निम्मा संघ बदलला, प्लेईंग ११मध्ये कोणाला संधी मिळणार? जाणून घ्या

SL vs PAK, Asia Cup 2023: एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत १७ वेळा पाकिस्तान आणि श्रीलंका आमनेसामने आले आहेत. कशी असेल प्लेईंग ११? जाणून घ्या.

SL vs PAK: Pakistan replaces half the squad in a do or die match who will get a chance in the playing XI
आशिया चषकात गुरुवारी होणारा पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना एखाद्या उपांत्य फेरीसारखा आहे. सौजन्य- (ट्वीटर)

Sri Lanka vs Pakistan, Asia Cup 2023: आशिया चषकात गुरुवारी होणारा पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना एखाद्या उपांत्य फेरीसारखा आहे. हा सामना जिंकणारा संघ रविवारी विजेतेपदासाठी टीम इंडियाशी भिडणार आहे. पाकिस्तानसाठी चिंतेची बाब म्हणजे गेल्या सामन्यात त्यांचे दोन प्रमुख गोलंदाज जखमी झाले होते, ते श्रीलंकेविरुद्ध खेळणार नाहीत. पाकिस्तानने आपल्या प्लेइंग ११ची घोषणा केली आहे, त्यात जवळपास निम्मा संघ बदलला आहे. श्रीलंका कोणत्या प्लेईंग ११मध्ये कोणाला संधी देणार? जाणून घेऊ या.

दुखापतींनी त्रस्त झालेल्या पाकिस्तानी क्रिकेट संघाने १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी आपली प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. नसीम शाह, फहीम अश्रफ, जखमी हारिस रौफ आणि फखर जमान यांच्या जागी सौद शकील, मोहम्मद वसीम ज्युनियर, मोहम्मद हारिस, आणि जमान खान यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. याबरोबरच मोहम्मद नवाजही अंतिम अकरामधील संघाचा भाग असणार आहे.

Pakistan Vs Australia Practice Match Updates
PAK vs AUS: हैदराबादी बिर्याणीमुळे बिघडली पाकिस्तानची फिल्डिंग! पराभवानंतर शादाब खानने केला खुलासा, पाहा VIDEO
BCCI to refund ticket money to fan
BCCI: विश्वचषकाच्या पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सराव सामन्यात चाहत्यांना का मिळणार नाही प्रवेश? जाणून घ्या कारण
Asia Cup 2023: Shock to Sri Lanka before the final against India Mahesh Theekshana may be out due to injury
Asia Cup 2023: आशिया चषक फायनलआधी श्रीलंकेला मोठा धक्का! ‘हा’अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे संघातून पडू शकतो बाहेर
Pakistan vs Sri Lanka, Asia Cup 2023 Match Updates
PAK vs SL: पाकिस्तानचा पत्ता कट! फायनल भारत वि. श्रीलंका

गेल्या सामन्यात श्रीलंकेने शानदार गोलंदाजी करत भारताला २१३ धावांत सर्वबाद केले होते. मात्र, श्रीलंकेची फलंदाजी खराब राहिली आणि संपूर्ण संघ १७२ धावांत ऑलआऊट झाला. सलग १३ सामने जिंकल्यानंतर भारताने श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली. टीम इंडियाने श्रीलंकेचा विजय रथ रोखला. सुपर-४ मध्ये त्याआधी भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. आता दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आज आमनेसामने असतील. खेळपट्टी गोलंदाजांसाठी उपयुक्त असल्याने ज्या संघाची गोलंदाजी चांगली आहे तो संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकतो.

गोलंदाज नसीम शाह आणि हारिस रौफ हे गेल्या सामन्यात जखमी झाले होते, ते फलंदाजीही करू शकले नाहीत, त्यामुळे ते श्रीलंकेविरुद्धच्या प्लेईंग ११ मधून बाहेर पडले आहेत. आशिया चषक २०२३मध्ये टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर, आता दुसरा संघ कोणता असेल, यासाठी आज पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रोमांचक सामना होण्याची शक्यता आहे. बांगलादेश आधीच अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. भारताने सुपर-४ मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव करून अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले.

हेही वाचा: Afghanistan Team WC 2023: नवीन विरुद्ध विराट २.०! कोहलीशी पंगा घेणाऱ्या अफगाणी खेळाडूचा विश्वचषक २०२३च्या संघात समावेश

पाकव्याप्त काश्मीरमधील मुलगा आज पाकिस्तान संघाकडून खेळणार?

पाकव्याप्त काश्मीरमध्ये जन्माला आलेला मुलगा जमान खान श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील मीरपूर या गावात त्याचा जन्म झाला. गरीब कुटुंबातील जमान हा काश्मीर टी२० लीगमध्ये खेळला आहे. त्यानंतर कॅनडा आणि श्रीलंकेतील टी२० लीगमध्ये खेळला. त्याने कोणतेही प्रथम श्रेणी सामने खेळलेले नाहीत, पण अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सहा टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने पाकिस्तान संघाकडून प्रतिनिधित्व केले आहे. दुखापतग्रस्त नसीम शाहच्या जागी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याचा पाकिस्तान संघात समावेश केला.

हेही वाचा: Rohit Sharma: “मी जोपर्यंत कर्णधार आहे तू संघाबाहेर…” कुलदीप यादवबद्दल श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर रोहितचे सूचक विधान

पाकिस्तानची संभाव्य प्लेईंग ११

मोहम्मद हरिस, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम ज्युनियर, जमान खान

श्रीलंकेची संभाव्य प्लेईंग ११

पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुशल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रम, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), ड्युनिथ वेल्स, महेश तीक्षणा, कसून राजिथा, मथिशा पाथिराना.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sl vs pak playing xi pakistans playing 11 announced see sri lankas probable eleven avw

First published on: 14-09-2023 at 14:01 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×