SL vs ZIM, Angelo Mathews: श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसरा सामना खूपच रोमांचक झाला. आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात झिम्बाब्वेने सहा गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. झिम्बाब्वेचा हा श्रीलंकेविरुद्धचा पहिला टी-२० विजय होता. १७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला शेवटच्या षटकात २० धावांची गरज होती. अँजेलो मॅथ्यूजने हे षटक टाकले आणि एक चेंडू शिल्लक असताना झिम्बाब्वेने चार विकेट्स राखून विजय मिळवला.

सामन्याच्या पहिल्या डावात नाबाद ६६ धावा करून श्रीलंकेची धावसंख्या १७० धावांच्या पुढे नेणाऱ्या मॅथ्यूजने अखेरच्या षटकात अनेक धावा दिल्या. त्याच्या षटकात तीन षटकार मारले गेले आणि संघाचा सामना गमवावा लागला. झिम्बाब्वेसाठी ल्यूक जोंगवेने दोन आणि मदंडेने शेवटच्या षटकात एक षटकार ठोकला. जोंगवेनेही चेंडूवर दोन विकेट्स देखील घेतल्या. त्याच्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. रोमहर्षक सामन्यानंतर आनंद व्यक्त करताना जोंगवे म्हणाला, “माझ्याकडे शब्द नाहीत. आज आम्ही जे काही केले त्यामुळे मी खूप आनंदी आहे.”

Rajat Patidar's 4 Consecutive Sixes Video Viral
६,६,६,६…पाटीदारने मयंकच्या षटकात धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Delhi beat Gujarat by 4 runs Shubman Gill reacts to defeat
DC vs GT : दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार शुबमन गिल संतापला, ‘या’ खेळाडूला धरले जबाबदार
Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

शेवटच्या षटकाचा थरार

शेवटच्या षटकात जोंगवेच्या आक्रमक फलंदाजीने सामना झिम्बाब्वेच्या बाजूने वळवला. संघाला ६ चेंडूत २० धावांची गरज होती, पण पहिल्या चेंडूवर षटकार आणि मॅथ्यूजचा नो बॉल यामुळे ६ चेंडूत १३ धावा असे समीकरण झाले. जोंगवेने फ्री हिटवर एक चौकार आणि पुढच्या चेंडूवर आणखी एक षटकार मारून आपले आक्रमण सुरू ठेवले, चार चेंडूत फक्त तीन धावा आवश्यक होत्या. पुढच्या चेंडूवर मॅथ्यूजने एकही धाव दिली नाही, पण षटकाच्या चौथ्या चेंडूवर तिक्षणाने महत्त्वाचा झेल सोडला. त्यामुळे झिम्बाब्वेला एक धाव मिळाली आणि यष्टिरक्षक मदंडे स्ट्राइकवर आला. त्याने पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला आणि झिम्बाब्वे संघाने सामना जिंकला.

झिम्बाब्वेने डावाच्या १९व्या षटकात १० धावा केल्या आणि शेवटच्या षटकात २४ धावा केल्या. एकंदरीत झिम्बाब्वेने शेवटच्या ११ चेंडूत ३४ धावा करून सामना जिंकला. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाला या विजयावर विश्वास ठेवणे कठीण झाले होते. तो म्हणाला, “आम्ही लढत राहिलो, जर शेवटपर्यंत सामना नेला तर नक्कीच जिंकू असा विश्वास होता. संघाने ते करून दाखवले, याचा आनंद आहे.”

हेही वाचा: IND vs AFG: टीम इंडिया विश्वविक्रमापासून फक्त एक विजय दूर, पाकिस्तानला मागे टाकत रचणार इतिहास

श्रीलंकेचे खराब क्षेत्ररक्षण

या सामन्यात श्रीलंकेचे क्षेत्ररक्षण अत्यंत खराब होते आणि ते पराभवाचे प्रमुख कारण ठरले. तिक्षणाने शेवटच्या षटकात जरी झेल पकडला असता तरी सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. दबावाखाली धावा काढणे नवीन फलंदाजासाठी सोपे नसते आणि सातवी विकेट पडल्यानंतर गोलंदाजांबरोबर फलंदाजी करणे खूप अवघड असते. क्रेग इर्विनने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टी-२० खेळी खेळली. त्याने ५४ चेंडूत ७० धावा केल्या, ज्यात सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. याशिवाय झिम्बाब्वेच्या विजयात श्रीलंकेच्या चुकाही कारणीभूत ठरल्या. श्रीलंकेचा कर्णधार वानिंदू हसरंगा याने आपल्या संघातील उणिवा मान्य करताना सांगितले की, “आमची टॉप ऑर्डर फ्लॉप झाली होती. आमचे क्षेत्ररक्षण खूपच निराशाजनक होते.” मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने गुरुवारी होणारा अंतिम सामना निर्णायक ठरणार आहे.