लंडन : स्पेनचा माजी तारांकित मध्यरक्षक सेस्क फॅब्रिगासने जवळपास दोन दशकांच्या कारकीर्दीनंतर फुटबॉलमधून निवृत्ती स्वीकारली आहे. २०१०च्या विश्वचषक विजेत्या स्पेन संघात फॅब्रिगासचा समावेश होता. आता ३६ वर्षीय फॅब्रिगास इटलीतील संघ कोमोचे प्रशिक्षकपद भूषवणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बार्सिलोनाच्या अकादमीचे फुटबॉलचे धडे गिरवल्यानंतर फॅब्रिगास इंग्लंडमधील आर्सेनल क्लबमध्ये दाखल झाला. फॅब्रिगासला वयाच्या १६व्या वर्षी पदार्पणाची संधी मिळाली होती. त्याने ऑक्टोबर २००३मध्ये लीग चषकात व्यावसायिक कारकीर्दीतील पहिला सामना खेळला. त्या वेळी आर्सेलनकडून खेळणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला होता. पुढे त्याने आर्सेनलचे कर्णधारपदही भूषवले, पण २०११मध्ये त्याने बार्सिलोनाकडे परतण्याचा निर्णय घेतला. बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व करताना त्याने २०१२-१३मध्ये ला लीगचे जेतेपद पटकावले. मात्र, सामने खेळण्याची सातत्याने संधी न मिळाल्याने त्याने बार्सिलोना क्लब सोडण्याचा निर्णय घेतला आणि इंग्लंडमधील चेल्सी संघाने त्याला खरेदी केले. चेल्सीकडून त्याने अप्रतिम कामगिरी केली. चेल्सीने २०१५ आणि २०१७मध्ये प्रीमियर लीगचे जेतेपद मिळवले होते. चेल्सीच्या या यशात फॅब्रिगासची भूमिका महत्त्वाची होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spanish footballer cesc fabregas retires at
First published on: 03-07-2023 at 02:55 IST