दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू पॉल हॅरिस याने या मोसमानंतर निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. निकी बोएनंतर हॅरिसने दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीची धुरा सांभाळली होती. ३७ कसोटी सामन्यांमध्ये त्याने १०३ बळी मिळवले आहेत, त्याचबरोबर १४ वर्षे त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहे. दक्षिण आफ्रिकेला इम्रान ताहीरसारखा युवा वेगवान फिरकीपटू सापडल्यावर पॉलला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.