सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचे आज सकाळी जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४६ वर्षांचे होते. प्रकृती खालावल्याने त्यांना बंगळुरू येथील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज एस. बोम्मई अभिनेत्याची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात उपस्थित होते.

क्रीडाविश्वाने पुनीत यांच्या जाण्यावर शोक व्यक्त केला आहे. माजी क्रिकेटर व्यंकटेश प्रसादने ट्वीट करून त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. ”आमचे लाडके पुनीत राजकुमार यांच्या निधनाबद्दल अत्यंत दु:ख झाले. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांसाठी माझ्या मनःपूर्वक संवेदना. मी त्यांच्या चाहत्यांना विनंती करतो की त्यांनी शांतता राखावी आणि कुटुंबासाठी या कठीण काळात प्रार्थना करावी. ओम शांती”, असे प्रसादने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले.

माजी फिरकीपटू अनिल कुंबळेनेही ट्वीट केले आहे. ”पुनीत राजकुमार यांच्या निधनाने धक्का बसला आणि खूप दुःख झाले, चित्रपटसृष्टीने एक रत्न गमावले आहे. मला भेटलेल्या सर्वोत्कृष्ट माणसांपैकी एक. खूप उत्साही आणि नम्र. खूप लवकर गेले. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि असंख्य चाहत्यांसाठी संवेदना.”

हरभजन सिंगनेही ट्वीट केले आहे. तो ट्वीटमध्ये म्हणाला, ”पुनीत राजकुमार गेले, हे ऐकून धक्काच बसला. आयुष्य हे खूप अनपेक्षित आहे. कुटुंबीयांना आणि मित्रांसाठी संवेदना. वाहेगुरू.”

”पुनीत राजकुमार यांच्या निधनाबद्दल ऐकून दु:ख झाले. ते नम्रल होते. भारतीय चित्रपटसृष्टीला मोठा धक्का आहे. त्याच्या आत्म्याला सद्गती मिळो. ओम शांती”, असे ट्वीट माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने केले आहे.

हेही वाचा – ‘देशद्रोही’ टीकेनंतर मोहम्मद शमीचं पहिलं ट्वीट; फोटो शेअर करत म्हणाला…

पुनीत राजकुमार यांच्याबाबत…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुनीत राजकुमार हे कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचे धाकटे चिरंजीव आणि प्रख्यात स्टार KFI शिवराज कुमार यांचे धाकटे बंधू होते. त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेट्टाडा हूवू’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. तसेच ‘चालिसुवा मोडागलू’ आणि ‘येराडू नक्षत्रगलू’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना कर्नाटक राज्याचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे.