आयपीएल 2021च्या त्याच्या पहिल्या दोन सामन्यात सनरायझर्स हैदराबादने जॉनी बेअरस्टोला मधल्या फळीत आजमावून पाहिले. या सामन्याक वृद्धिमान साहा डेव्हिड वॉर्नरसोबत सलामीला येत होता. मात्र, काल झालेल्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात बेअरस्टोला सलामी फलंदाज म्हणून बढती मिळाली. या संधीचा फायदा उचलत बेअरस्टोने पॉवरप्लेमध्ये मुंबईच्या आघाडीच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. बेअरस्टो-वॉर्नर यांनी पॉवरप्लेमध्ये 57 धावा केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डेव्हिड वॉर्नरने संयमी, तर जॉनी बेअरस्टोने आक्रमक पवित्रा धारण केला. बेअरस्टोने न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज अ‍ॅडम मिल्ने आणि ट्रेंट बोल्टला लक्ष्य केले. डावाच्या तिसर्‍या षटकात बेअरस्टोने बोल्टला दमदार षटकार ठोकला. या षटकारामुळे हैदराबादच्याच डगआऊटमधील फ्रिजची काच फुटली. या षटकात, बेअरस्टोने पहिल्या चार चेंडूंमध्ये 18 धावा केल्या.

 

जॉनी बेअरस्टोने 22 चेंडूत तीन चौकार व चार षटकारांच्या मदतीने 43 धावा केल्या. त्याने वॉर्नरबरोबर 7.2 षटकांत 67 धावांची भागीदारी केली. बेअरस्टो क्रुणाल पंड्याच्या गोलंदाजीवर हिटविकेट झाला.

असा रंगला सामना

रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने चेन्नईत पुन्हा एकदा कमाल करून दाखवली आहे. चेपॉक मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात आपल्या सन्मानजनक धावसंख्येचा बचाव करत त्यांनी सनरायझर्स हैदराबादवर 13 धावांनी विजय मिळवला. हैदराबादचा हा यंदाच्या हंगामातील सलग तिसरा पराभव ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकात 5 बाद 150 धावा केल्या. मु्ंबईकडून रोहित शर्मा, क्विंटन डि कॉक आणि कायरन पोलार्ड यांनी उपयुक्त योगदान दिले. प्रत्युत्तरात हैदराबादच्या जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर या सलामी जोडीने दमदार सुरुवात करून दिली. मात्र, मुंबईच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत हैदराबादचा डाव 137 धावांवर संपुष्टात आणला. पोलार्डला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२१ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Srh batsman jonny bairstows six of trent boult breaks glass of a fridge adn
First published on: 18-04-2021 at 15:31 IST