SL vs BAN, Playing XI: गेल्या हंगामात अंतिम फेरीत प्रवेश करणारा श्रीलंकेचा संघ आज आशिया चषक २०२५ स्पर्धेत आपला पहिला सामना खेळणार आहे. श्रीलंकेचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. तर बांगलादेशचा संघ आज आपला दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हाँगकाँगविरुद्ध झालेल्या सामन्यात लिटन दासने दमदार अर्धशतकी खेळी करून बांगलादेशला विजय मिळवून दिला होता. आज होणाऱ्या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

याआधी झालेल्या द्विपक्षीय मालिकेत श्रीलंकेला बांगलादेशकडून झालेल्या मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता. या स्पर्धेत श्रीलंकेची जबाबदारी चरिथ असलंकाकडे सोपवण्यात आली आहे. तर मुख्य फलंदाज म्हणून पथुम निसंका आणि कुसल मेंडीस यांना स्थान देण्यात आले आहे. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून वानिंदू हसरंगा आणि महेश थिक्षणा यांचा समावेश करण्यात आलेला आहे. कामिंदू मेंडिसकडून फलंदाजीसह गोलंदाजीतही योगदान देण्याची जबाबदारी असणार आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:

बांगलादेश- लिटन दास, मोहम्मद परवेज हुसेन, तंजीद हसन, तौहीद हृदोय, शमीम हुसेन, जाकेर अली, महेदी हसन, रिशाद हुसेन, तंजीम हसन साकीब, तस्कीन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान.

श्रीलंका – पथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कामिल मिशारा, के परेरा, चरीथ असलंका (कर्णधार), कामिंदू मेंडिस, दासून शनाका, वानिंदू हसरंगा, महिश थिक्षणा, दुष्मंथा चमीरा, मथिशा पथिराना.

या स्पर्धेसाठी असे आहे दोन्ही संघ:

बांगलादेशचा संघ: लिटन दास, मोहम्मद परवेज हुसेन, तंजीद हसन, तौहीद हृदोय, शमीम हुसेन, जाकेर अली, महेदी हसन, रिशाद हुसेन, तंजीम हसन साकीब, तस्कीन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान, सैफ हसन, नसुम अहमद, मोहम्मद सैफुद्दीन, नुरूल हसन, शोरफुल इस्लाम.

श्रीलंकेचा संघ : पथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कामिल मिशारा, के परेरा, चरीथ असलंका (कर्णधार), कामिंदू मेंडिस, दासून शनाका, वानिंदू हसरंगा, महिश थिक्षणा, दुष्मंथा चमीरा, मथिशा पथिराना, नुवानीडू फर्नांडो, जेनिथ लियानगे, डुनिथ वेललागे, बिनुरा फर्नांडो, दासून शनाका, नुवान तुषारा, कामिल मिशारा, चमिका करूणारत्ने, कुसल परेरा.