कोलकाता येथे १ सप्टेंबरला होणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळा(बीसीसीआय)च्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीला पायउतार झालेले अध्यक्ष एन. श्रीनिवासन उपस्थित राहण्याची शक्यता आहे, असे मंडळाचे अध्यक्ष रवी सावंत यांनी सांगितले.
‘‘माझ्या मते श्रीनिवासन त्या बैठकीला हजर राहतील आणि ते हजर राहणार असतील तर निश्चितच ते अध्यक्षस्थान भूषवतील,’’ असे सावंत यांनी पत्रकारांना सांगितले. मुंबई क्रिकेट असोसिएशन(एमसीए)तर्फे बुधवारी पंचांचा वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बीसीसीआयच्या कार्यकारणीची बैठक याआधी २ ऑगस्टला आयोजित करण्यात आली होती. परंतु बीसीसीआयच्या परिपत्रकात ‘तातडीची’ असा उल्लेख न करण्यात आल्यामुळे मंडळाला ती बैठक रद्दबातल करण्यात आली होती.
संग्रहित लेख, दिनांक 29th Aug 2013 रोजी प्रकाशित
बीसीसीआयच्या बैठकीला श्रीनिवासन हजर राहण्याची शक्यता -रवी सावंत
कोलकाता येथे १ सप्टेंबरला होणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळा(बीसीसीआय)च्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीला पायउतार झालेले
First published on: 29-08-2013 at 04:40 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Srinivasan may present in bcci meeting