पालखी मैदान, सोलापूर येथे सुरू असलेल्या ५७व्या राज्य र्अंजक्यपद खो-खो स्पर्धेत पुण्याच्या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत धडक मारली. पुरुष गटात पुण्यासमोर मुंबई उपनगरचे आव्हान असेल, तर पुण्याच्या महिलांची ठाण्याशी गाठ पडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुरुष गटाच्या उपांत्य सामन्यात पुण्याने सांगलीवर २२-१८ अशी सरशी साधली. र्मिंलद कुरूपे (१.२० मिनिटे आणि ८ गडी), सागर लेंग्रे (१.३० मि., ४ गडी) यांनी पुण्यासाठी अष्टपैलू चमक दाखवली.

दुसऱ्या उपांत्य लढतीत गतविजेत्या मुंबई उपनगरने ठाण्याला १९-१८ असे एका गुणाच्या फरकाने नमवले. निहार दुवळे (६ गडी), ओंकार सोनावणे (१.५० मि.) यांनी उपनगरच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

महिला गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या पुण्याने उस्मानाबादला १५-१३ असे पराभूत केले. प्रियंका इंगळे (२.३० मि., ५ गडी), ऋतिका राठोड (१.२० मि., ४ गडी) या दोघी पुण्याच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या.

महिलांच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत ठाण्याने रत्नागिरीवर १४-११ अशी मात केली. ठाण्याच्या रेश्मा राठोडने आक्रमणात तब्बल सात गडी बाद करतानाच ३ मिनिटे संरक्षण करून या सामन्यात छाप पाडली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State championship kho kho competition both pune teams in the final akp
First published on: 14-12-2021 at 00:16 IST