जागतिक क्रमवारीतील अनेक नामवंत खेळाडूंच्या सहभागामुळे चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेतील दुहेरीचे सामने अधिक रंगतदार होतील अशी अपेक्षा आहे. ही स्पर्धा पाच जानेवारीपासून सुरू होत आहे.  दक्षिण आशियात होणारी ही एकमेव एटीपी स्पर्धा असल्यामुळे अनेक नामवंत खेळाडूंनी या स्पर्धेबाबत उत्सुकता दाखविली आहे. त्यामध्ये स्टानिस्लास वॉवरिंक, रॉबर्ट बाटिस्टा अ‍ॅगुट, फेलिसिआनो लोपेझ, मॅक्स मिर्नयी, इव्हान डोजिक, मेट पेव्हिक, आंद्रे बेगॉमन, रॉबिन हास, जोहान ब्रुनस्ट्राम, निकोलस मोन्रो, ऑलिव्हर मराच यांचा सहभाग निश्चित झाला आहे. त्यांच्याबरोबरच पाब्लो बुस्टा, गुर्लिमो गार्सिया लोपेझ, येन हुसान लिऊ, जोनाथन मरे, फ्रान्टिसेक सेरमाक, जिरी व्हेसेली, गिलेस म्युलर, इगोर सिसिलिंग यांच्याकडूनही या स्पर्धेत अनपेक्षित विजयाची अपेक्षा केली जात आहे.
भारताच्या साकेत मायनेनी, श्रीराम बालाजी व जीवन नेदुन्चेळीयन यांना दुहेरीत विशेष प्रवेशिकेद्वारे स्थान मिळाले आहे.