पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय मिळवला. शेवटच्या इनिंगमध्ये ३८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ ३३४ धावांवर ऑल आऊट झाला. त्यामुळे इंग्लंडने ४९ धावांनी विजय मिळवला. पाच कसोटी सामन्यांची अॅशेश सीरिज २-२ ने बरोबरीत सुटली आहे. मात्र मागची मागची अॅशेस जिंकल्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे अॅशेस कायम राहणार आहे.

स्टुअर्ड ब्रॉडच्या नावावर अनोखा रेकॉर्ड

शेवटची कसोटी खेळणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडने ऑस्ट्रेलियाची शेवटची विकेट घेऊन इंग्लंडला हा खास विजय मिळवून दिला. कसोटी करिअरच्या शेवटच्या चेंडूवर विकेट घेण्याचा अनोखा रेकॉर्डही यामुळे स्टुअर्ट ब्रॉडच्या नावावर कोरला गेला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ६०४ विकेट्स मिळवत ब्रॉडने निवृत्ती घेतली आहे.

इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने पाचव्या दिवसाची सुरुवात १३५/० अशी केली होती. पण शेवटच्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ ऑल आऊट झाला. क्रिस वोक्सने ४, मोईन अलीने ३, स्टुअर्ट ब्रॉडने २ आणि मार्क वुडने १ विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू डेव्हिड वॉर्नरचीही ही शेवटची अॅशेस होती. पुढील वर्षी सिडनीत होणाऱ्या कसोटी सामन्यानंतर डेव्हिड वॉर्नर निवृत्त होणार आहे. सिडनी हे वॉर्नरचं होम ग्राऊंड आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाच टेस्ट मॅचच्या या ऐतिहासिक सीरिजच्या पहिल्या दोन्ही मॅच ऑस्ट्रेलियाने जिंकल्या होत्या. यानंतर तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडने जोरदार पुनरागमन करत विजय मिळवला. मॅनचेस्टरमध्ये झालेली चौथी टेस्ट ड्रॉ झाली. या सामन्यामध्ये इंग्लंड विजयाच्या जवळ होती, पण पावसामुळे शेवटच्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही, त्यामुळे इंग्लंडच्या तोंडून विजयाचा घास हिरावला गेला. अखेर पाचव्या टेस्टमध्ये रोमहर्षक विजय मिळवत इंग्लंडने सीरिजमध्ये २-२ अशी बरोबरी केली.